माझे राजकीय गुरू निलेश राणेंकडून स्वकमाईतून दान करण्याची शिकवण : विशाल परब

Google search engine
Google search engine

वेंगुर्लेत “विशाल श्री” शरीर सौष्ठव स्पर्धेचे दिमाखदार उद्घाटन

वेंगुर्लेत सर्वात मोठा मत्स्य महोत्सवाचे करणार आयोजन

वेंगुर्ल । प्रतिनिधी : मी ६५ कातकरी मुलांना दत्तक घेतल आहे. हा माझ्या जीवनातील एक सर्वात मोठा क्षण आहे. शंभर रूपये कमवले तर दहा रूपये जनतेतील सर्व सामान्य लोकांसाठी खर्च करावेत ही शिकवण मला माझे राजकीय गुरु निलेश राणे यांनी दिली आहे. या शिकवणीतून भविष्यातही जनतेसाठी व सर्वसामान्यांसाठी जेवढं काय करता येईल ते नक्कीच करेन अशी ग्वाही देतानाच भविष्यात वेंगुर्ल्यात सर्वात मोठा व भव्यदिव मत्स्य महोत्सव आयोजित करण्याचा आपला मानस असल्याचे भाजपचे युवा नेते तथा हिंद मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष विशाल परब यांनी जाहिर केले.

विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित “विशाल श्री” शरीर सौष्ठव स्पर्धेचे उद्घाटन दिप प्रज्वलन करून व श्रीफळ वाढवून गोव्याचे आमदार आमदार जीत आरोलकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर युवा उद्योजक विशाल परब,भाई सावंत,सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजू परब,कुडाळ भाजप तालुकाध्यक्ष विनायक राणे,ओरोस भाजप मंडल अधिकारी दादा साईल,अक्रम खान,प्रितेश राऊळ,भाई राणे ,राजन गिरप,दादा साईल सुहास गवंडळकर,वसंत तांडेल,अनंत परब,किशोर सनसुरकर,प्रणव वायंगणकर, प्रशांत आपटे,बाळू देसाई, अँड.अनिल निरवडेकर आदी उपस्थित होते.

विशालची आणि माझी २००८ मध्ये ओळख झाली. अतिशय मनमिळाऊ व स्मितभाषी व्यक्तिमत्व म्हणून त्याची ओळख आहे.विशाल च्या सर्व इच्छा परमेश्वराने पूर्ण कराव्यात हिच ईश्वर चरणी प्रार्थना आहे.असे सांगत विशाल परब यांचे जीवलग मित्र सावंतवाडीचे नगराध्यक्ष संजू परब यांनी शुभेच्छा दिल्या.

यावेळी बोलताना विशाल परब यांनी उपस्थितांना धन्यवाद देत तुमच्या शिवाय कार्यक्रम होण शक्य नाही.मी फक्त नाममात्र आहे.संपूर्ण जिल्ह्यात हे जे कार्यक्रम भारतीय जनता पार्टी,माझे सहकारी मित्र,प्रेमी यांनी हे आयोजन केलय ते मी आयुष्यात विसरू शकत नाही.यावर्षी सर्व कार्यकर्त्यांनी ठरवल की आठ दिवसाचे कार्यक्रम करूया आणी ते पण गोरगरीब जनतेसाठी अले स्पष्ट केले.

आजच आपण मुंबईत भाजपचे प्रदेश सचिव निलेश राणे व उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट घेऊन १५ ऑक्टोबर ला वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळ्याला उपस्थित राहण्याची विनंती केली आहे. ह्या दोन्ही नेत्यांनी येण्याचं आश्वासित केल आहे.माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील हे दोन द्विगज नेते एकाच व्यासपीठावर येणार असून त्यांना एकत्र आणण्याच योग मला आणता आला याचा फार आनंद होत असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

Sindhudurg