नातूवाडी, शिरवली, पिंपळवाडी, कोंडीवली धरण पूर्ण क्षमतेने भरले
खेड (प्रतिनिधी) तालुक्यात समाधानकारक पाऊस पडल्याने नातूवाडी, शिरवली, पिंपळवाडी, कोंडीवली ही धरणे आता पूर्ण क्षमतेने भरली आहेत. या धरणातील पाण्याचा वापर उन्हाळी शेतीसाठी आणि पिण्यासाठी होत असल्याने धरण परिसरातील गावांनी समाधान व्यक्त केले आहे.
दरवर्षीप्रमाणे पावसाने सरासरी गाठली असल्याने नातूवाडी धरणाचे गेट टाकल्याने सांडव्यातून होणारा विसर्ग आता थांबला आहे. या धरणातील पाण्यावर खवटी, नातूनगर, येथील ग्रामस्थ उन्हाळी शेतीचे पीक घेत असतात. शिरवली धरणातून शिरवली, सुकीवली, करटेल या गावांना शेतीसाठी पाण्याचा पुरवठा केला जातो. पिंपळवाडी धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे.तर या धरणातून कुंभाड, खोपी, मिरले, बीजघर या गावांना पिण्यासाठी आणि उन्हाळी पिके घेण्यासाठी पाणी पुरवठा केला जात आहे.
कोंडीवली धरण परिसरातही समाधानकारक पाऊस पडला आहे. या घरणातून कोंडीवली आणि शिव या गावांना पिण्यासाठी पाण्याचा पुरवठा केला जात आहे. धरण परिसरात झालेल्या समाधानकारक पावसामुळे अनेक गावांचा पिण्याचा आणि सिंचनाचा प्रश्न आता मिटला आहे.
नातूवाडी धरण देखील पूर्ण क्षमतेने भरले आहे. २८.०८० दशलक्ष घनमीटर पाणी साठवण क्षमता आहे. सध्या धरणात २७.२३० धरणाची पाणी साठवण क्षमता ३.३६५ दशलक्ष घनमीटर असून दशलक्ष घनमीटर इतका पाणीसाठा उपलब्ध आहे. शिरवली आहे. ॥ पिंपळवाडी धरणाची पाणी साठवण क्षमता १६.७० दशलक्ष सध्या धरणात २.९०७ दशलक्ष घनमीटर इतका पाणीसाठा उपलब्ध घनमीटर इतकी आहे. या धरणात १५.७६ दशलक्ष घनमीटर दशलक्ष घनमीटर पाणी साठवण क्षमता आहे. सध्या धरणात ३.२३२ इतका पाणी साठा उपलब्ध आहे. कोंडीवली धरणात ३.३०६ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा उपलब्ध आहे.









