जाणवली पुलावर तरंदळे फाटा येथे महामार्गावर झाला होता अपघात
दौऱ्यावर असताना नितेश राणे अशा घटना पाहून नेहमीच करतात मदत
संतोष राऊळ (कणकवली ) भाजप प्रवक्ते आमदार नितेश राणे जिल्ह्यातील प्रत्येक व्यक्तीशी जोडले गेलेले आहेत याचे उत्तम उदाहरण जाणवली नदी पुलावर पाहावयास मिळाले. वैभववाडीचा दौरा आटपून कणकवली कडे येत असताना महामार्गावर अपघात झाल्याचे त्याने पाहिले आणि आपल्या गाड्या यांबावून अपघात ग्रस्तांची मदत केली. अपघात कसा झाला ? जखमी कोण आहे ? त्यांना कोणती मदत लागणार आहे का ? याची चौकशी करून अपघातग्रस्तांना धीर दिला. मतदारसंघाच्या दौऱ्यावर असताना जेव्हा जेव्हा रस्त्यात अशा घटना घडतात त्यावेळी आमदार नितेश राणे नेहमीच मदतीला धावून जातात. किती महत्त्वाचा दौरा असला तरी आणि त्या ठिकाणी पोचण्यास वेळ होत असला तरी अपघाताच्या ठिकाणी थांबून त्या लोकांना मदत करतात हे आज पुन्हा दिसून आले.
कणकवली तरंदळे फाटा येथेल उड्डाणपुलावर हुंबरठ वरून कणकवलीच्या दिशेने येणाऱ्या वॅगनर कारचा बुधवारी दुपारी 1.30 च्या सुमारास अपघात झाला. यामध्ये कारचे पुढील चाक तुटून पडल्याने गाडीचे मोठे नुकसान झाले. हा अपघात नेमका कसा झाला हे माहीत नसले तरी सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. गाडीमध्ये असणाऱ्या एकाला किरकोळ दुखापत झाली आहे. यावेळी आमदार नितेश राणे यांचा ताफा कणकवलीच्या दिशेने येत असताना अपघात झाल्याचे दिसतात नितेश राणे यांनी गाडीतून उतरून जखमींची विचारपूस केली. यावरून आ नितेश राणे याना आपल्या जनतेची काळजी असल्याचे दिसून आले.












