नागावे उपसरपंचपदी सुशांत साळवी यांची निवड

चिपळूण (वार्ताहर) : नागावे येथील उपसरपंचपदी शिवसेना संपर्क कार्यालयाचे प्रमुख व तालुकाप्रमुख विनोद झगडे यांचे खंदे समर्थक सुशांत साळवी यांची सोमवारी निवड झाल्याने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. नागावे ग्रामपंचायतीचे उपसरपंचपदाबाबत निवडणुकीनंतर झालेल्या तडजोडीनुसार उपसरपंचानी राजीनामा दिला होता. त्यामुळे रिक्त उपसरपंचपदी सुशांत साळवी यांची बिनविरोध निवड झाल्याने त्यांचे तालुका प्रमुख विनोद झगडे, उपतालुका प्रमुख राकेश शिंदे, शहर प्रमुख शशिकांत मोदी यांच्यासह सरपंच प्रकाश चिपळूणकर व सर्व सदस्यांनी अभिनंदन केले आहे.