बिडवाडी गावचे माजी सरपंच संदीप चव्हाण यांचे निधन

 

कणकवली : कणकवली तालुक्यातील बिडवाडी गावचे माजी सरपंच व भाजपाचे माजी उपतालुका अध्यक्ष संदीप प्रभाकर चव्हाण (वय ५३) यांचे अल्पशा आजाराने उपचारादरम्यान मुंबई लीलावती येथील रुग्णालयात आज सकाळी ११:३० वा. च्या सुमारास निधन झाले. त्यांच्यावर शनिवारी बिडवाडी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे एक विवाहित मुली असा परिवार आहे. बिडवाडी गावच्या सरपंच पूजा चव्हाण यांचे ते दिर तर बाबजी, शेखर चव्हाण यांचे ते भाऊ होत. संदीप चव्हाण यांचा स्वभाव हा मनमिळावू होता. त्यामुळे त्यांचा कणकवली तालुक्यासह जिल्ह्यात मोठा मित्र परिवार होता. सामाजिक कार्यातही त्यांचा नेहमी सक्रिय पुढाकार असे, राजकारणात देखील ते सक्रिय सहभागी असत.