केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांची वचनपूर्ती,राज्यातील एएनएम ५९७ कर्मचारी पुन्हा सेवेत

Google search engine
Google search engine

कणकवली येथे भेट घेऊन आरोग्य सेविकांनी मानले आभार

सेवेतून खंडित झालेल्या त्याच ठिकाणी आरोग्य सेविका पुन्हा देणार सेवा

राष्ट्रीय आरोग्य अभियान आणि आरोग्य सेवा आयुक्त यांनी परिपत्रक केले जरी

संतोष राऊळ (कणकवली)
केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांनी राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत राज्यातील ५९७ आरोग्य सेविकांची पदे केंद्र सरकारकडून मंजूर करून घेतले आहेत. त्यामुळे या अभियाना अंतर्गत राज्यातील सेवेतून कमी केलेल्या ५९७ आरोग्य सेविकांना (एएनएम) सेवत पुन्हा रुजू करून घेण्यात आले आहे. त्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सेवेतून कमी केलेल्या २० आरोग्य सेविकांसह राज्यातील ५९७ कर्मचारी नोकरीत होत्या त्या ठिकाणी सेवा देणार आहेत. तसे सेवेत परत घेण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. केंद्र सरकारकडून केद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांनी ५९७ एवढी कमी केलेली पदे पुन्हा मंजूर करून घेऊन न्याय मिळवून देऊ असे आश्वासन दिले होते. तो दिलेला शब्द केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पूर्ण केला आहे. त्याबद्दल प्रत्यक्ष भेट घेऊन आरोग्य सेविकांनी आभार मानले आहेत.
राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत राज्य सरकारला केंद्र सरकारने ही सर्व पदे केंद्रीय उद्योग मंत्री राणे यांच्या सूचनेवरून पुन्हा मंजूर करून दिली असल्याने सेवा खंडित केलेल्या ५९७ आरोग्य सेविकांना नोकरीत समाविष्ट केले आहे. तसे आदेश राष्ट्रीय आरोग्य अभियान आणि आरोग्य सेवा आयुक्त व संचालक धीरज कुमार यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना आदेश काढून कळवले आहे. तशा पद्धतीचे परिपत्रक जरी करण्यात आले आहे.
केंद्रीय उद्योग मंत्री तथा माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांची सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्य सेविकांनी भेट घेऊन वस्तुस्थिती निदर्शनास आणून दिली होती. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राज्याचे आरोग्य मंत्री तसेच देशाचे आरोग्य मंत्री यांच्याशी चर्चा करून समन्वय घडवून आणला आणि राज्यात ५९७ एएनएम कर्मचाऱ्यांना न्यायमिलवून दिला. कर्मचाऱ्याना भेटी दरम्यान केंद्रीय मंत्री राणे यांनी देईलेले आश्वासन महिना भारत पूर्ण केले आहे. त्याबद्दल आरोग्य सेविकांनी त्यांची कणकवली येथे भेट घेवून सिंधुदुर्ग जिल्हा एएनएम संघटनेच्या माध्यमातून आभार मानले आहेत.