करूळ येथे माघी गणेश जयंती निमित्त भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन

Google search engine
Google search engine

मिस इंडिया 2022 ची मानकरी प्रणाली खांबे यांची उपस्थिती ठरणार कार्यक्रमाचे आकर्षण

वैभववाडी | प्रतिनिधी : करूळ भोयडेवाडी येथे माघी गणेश जयंती निमित्त बुधवार दि. 25 जानेवारी रोजी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. फेम मिस इंडिया 2022 ची मानकरी प्रणाली खांबे यांची उपस्थिती या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरणार आहे. यावेळी रात्री 10 वाजता तोरा माझ्या लावणीचा (मुंबई) हा बहारदार कार्यक्रम संपन्न होणार आहे. मुंबई व पुणे येथील लावणी सम्राज्ञी या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.
रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात प्रणाली या कोकण कन्येचा जन्म झाला आहे. सिमला टीम झेनिथद्वारे सिमला हिमाचल प्रदेश येथे मॉडेल मिस इंडिया 2022 चे आयोजन करण्यात आले होते. प्रणाली खांबे हिने या स्पर्धेत बाजी मारत आयएसओ प्रमाणित द फेम मिस इंडिया 2022 चे विजेतेपद पटकाविले आहे. खांबे हिला हिमाचल प्रदेशचे राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांच्या हस्ते तिला सन्मानित करण्यात आले होते. तिला दीप साडीजची ब्रँड अँबेसिडर, महाराष्ट्र मलबार, जाहिरातीत संधी, अल्बम व गाणी बक्षिसे म्हणून देण्यात आली आहेत.

अमरावती येथे टीम झेनिथद्वारा दि. 7 मे 2022 रोजी आयोजित करण्यात आलेल्या द फेम महाराष्ट्र 2022 मॉडेलिंग अँड डान्स स्पर्धेत मिस महाराष्ट्र 2022 होण्याचा मान तिने पटकविला होता. त्यानंतर तिची हिमाचल प्रदेश येथे मिस इंडिया 2022 स्पर्धेकरिता महाराष्ट्रातून निवड झाली होती.प्रणाली खांबे ही पदवीधर आहे. सध्या ती अभिनय व मॉडेलिंग क्षेत्रात काम करत आहे. प्रणाली खांबेची थायलंड येथे होणाऱ्या द फेम इंटरनॅशनल स्पर्धेसाठी निवड झाली आहे. खांबे हिने 2016 पासून व्यावसायिक नाटकातून रंगमंचावर पदार्पण केले. करुळचे सुपुत्र सिने नाट्यदिग्दर्शक रमेश वारंग यांचेही खांबे यांना विशेष सहकार्य लाभले आहे.करूळ येथे माघी गणेश जयंती निमित्त 25 जानेवारी रोजी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यातआले आहे. रामेश्वर युवा मित्र मंडळ करूळ भोयडेवाडी यांच्या वतीने कार्यक्रम संपन्न होणार आहेत. यनिमित्त सकाळी 6 वा. अभिषेक, 8 वा. महाआरती, 9 वा. पालखी मिरवणूक, सकाळी 9:30 वाजता सत्यनारायण महापूजा, दुपारी 12 वा. महाप्रसाद, दुपारी 3:30 ते 8 वा. सुस्वर भजने, रात्री 8 वाजता पालखी नृत्य, रात्री 10 वाजता तोरा माझ्या लावणीचा हा बहारदार कार्यक्रम संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाला तालुक्यातील तसेच जिल्ह्यातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन रामेश्वर युवा मित्र मंडळ भोयडेवाडी यांच्यावतीने करण्यात आले आहे.