विशाल परब हे स्पार्कींग मॅन” : आमदार जीत आरोलकर

Google search engine
Google search engine

वेंगुर्ले: विशाल परब यांच्यामध्ये तेज आहे.म्हणून मी त्याला आजच नाव देतो की “स्पार्कींग मॅन”.भविष्यात मी अभिमानाने सांगतो की विशाल परब हे आमदार होणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेख आहे, असे गौरवोद्गार आमदार जीत आरोलकर यांनी काढले.
वेंगुले येथील कै.मधुसुदन कालेलकर सभागृहात आयोजित “विशाल श्री” शरीर सौष्ठव स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी मांद्रे विधानसभा मतदार संघाचे आमदार जीत आरोलकर बोलत होते. यावेळी वेंगुर्लेचे माजी नगराध्यक्ष राजन गिरफ सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजू परब ॲङ. अनिल निरवडेकर व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
विशाल मी तुला शब्द देतो की वेंगुर्ल्या तालुक्याच्या शेजारी माझा मतदार संघ आहे.येथील मुल जी कामाला येतात त्यांना कुठलीच अडचण मी येवू देणार नाही.विशाल परब यांच्या सारखा मला दिलदार मित्र लाभला याचे मी भाग्य समजतो. विशाल परब यांनी जे जीवनात कमी कालावधीत कमवल आणी यश मिळवल ते साध नाही.त्यासाठी जिद्द आणी मेहनत आहे, त्यामुळे तुझ्या जीवनात नक्कीच उज्वल भवितव्य आहे अशा शब्दात त्यांनी विशाल परब यांना शुभेच्छा दिल्या.

Sindhudurg