सावंतवाडी पत्रकार संघ उपविजेता
इडमिशन पुरस्कृत व सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे आयोजित स्पर्धा जल्लोषात संपन्न
अनेक पत्रकारांच्या सुप्त क्रीडा गुणांचे दर्शन
सावंतवाडी । प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघ संलग्न सावंतवाडी तालुका पत्रकार संघाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या पत्रकारांसाठीच्या जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेचा मानकरी वेंगुर्ला पत्रकार संघ ठरला. तर सावंतवाडी पत्रकार संघ उपविजेता संघ ठरला. या संपूर्ण स्पर्धेत अष्टपैलू कामगिरी करत वेंगुर्ले संघाचा खेळाडू हर्षल परब याने स्पर्धेच्या मालिकावीर तसेच अंतिम सामन्याचा सामनीवर चषकावर आपले नाव कोरले. स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज कणकवली संघाचा गणेश इस्वलकर, उत्कृष्ट फलंदाज सावंतवाडी संघाचे सचिन रेडकर तर अमोल गोसावी याला उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून गौरविण्यात आले.सावंतवाडी पत्रकार संघ आयोजित व इडमिशन संस्थेच्या माध्यमातून प्रायोजित वया करण्यात आलेल्या या स्पर्धेतील विजेत्या उपविजेत्या संघांना तसेच वैयक्तिक पारितोषिकांचे मानकरी ठरलेल्या खेळाडूंना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
यावेळी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी, राष्ट्रवादीच्या कोकण महिला अध्यक्षा सौ. अर्चना घारे, काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा साक्षी वंजारी, इडमिशन संस्थेचे अधिकारी संदीप नाटलेकर, विनायक जाधव, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर, जेष्ठ पत्रकार गजानन नाईक, सैनिक बँकेचे व्यवस्थापक सुनिल राऊळ, डिजीटल मीडियाचे जिल्हाध्यक्ष अमोल टेंबकर, सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे सदस्य प्रविण मांजरेकर, आयोजन समिती अध्यक्ष सचिन रेडकर, माजी नगरसेवक बाबू कुडतरकर, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, सामाजिक बांधिलकी संघटनेचे अध्यक्ष रवि जाधव, बाळू कशाळीकर, देव्या सुर्याजी, सायली दुभाषी, चित्रा बाबर – देसाई, जिल्हा पत्रकार संघाचे खजिनदार ॲड. संतोष सावंत, सदस्य हरिश्चंद्र पवार, सागर चव्हाण, अभिमन्यू लोंढे, रामचंद्र कुडाळकर आदी उपस्थित होते.
तत्पूर्वी सकाळी या स्पर्धेच उद्घाटन सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष तथा भाजपचे जिल्हा प्रवक्ते संजू परब यांच्या हस्ते करण्यात आले. यावेजी कॉंग्रेस महिला जिल्हाध्यक्षा साक्षी वंजारी, भाजप शहराध्यक्ष अजय गोंदावळे, जेष्ठ पत्रकार अण्णा केसरकर, गजानन नाईक, अभिमन्यू लोंढे, कोकणसादचे संपादक सागर चव्हाण, अमोल टेमकर, प्रवीण मांजरेकर, संतोष राऊळ, हरिश्चंद्र पवार आदी उपस्थित होते.स्पर्धे दरम्यान भाजप नेते तथा हिंद मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष युवा उद्योजक विशाल परब, माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी स्पर्धेला भेट देत शुभेच्छा दिल्या. तसेच क्रेडाईचे अध्यक्ष नीरज देसाई, शरद सावंत, खोर्जुवेकर, माजी आरोग्य सभापती मंगेश तळवणेकर, माजी जि.प. सभापती अंकूश जाधव, कॉंग्रेसचे पदाधिकारी समीर वंजारी, महेंद्र अकॅडमीचे संचालक महेंद्र पेडणेकर, ज्ञान प्रबोधिनीचे संचालक राजेश्वर रेडकर, प्राथमिक शिक्षक संघटना जिल्हाध्यक्ष म. ल. देसाई, संतोष गांवसआदी मान्यवरांनी उपस्थित राहत शुभेच्छा दिल्या. माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, साक्षी वंजारी यांनी उपस्थित राहत पत्रकारांच्या सामन्यांचा आस्वाद घेतला.
तर माजी नगरसेवक सुधीर आडीवरेकर, ॲड. परिमल नाईक, उदय नाईक व संतोष गांवस यांनी सावंतवाडी तालुका पत्रकार संघ आयोजित या स्पर्धेच्या चषकांचे वसावंतवाडी संघाच्या टी-शर्ट चे अनावरण केले. यावेळी त्यांनी या स्पर्धेला शुभेच्छा देत संपूर्ण सहकार्याचे आश्वासन दिले.तत्पूर्वी झालेल्या उपांत्य फेरीच्या पहिल्या सामन्यात सावंतवाडी संघाने दोडामार्ग संघावर मात करीत अंतिम सामन्यात प्रवेश केला. या सामन्यात यशवंत मांजरेकर यांच्यासह अनिकेत गावडे यांची बहारदार फलंदाजी व अंतिम शतकातील सचिन रेडकर यांच्या उत्कृष्ट गोलंदाजीमूळे दोडामार्ग संघावर तब्बल २० धावांनी विजय मिळविला. तर शेवटच्या चेंडूपर्यंत रोमहर्षक ठरलेल्या व बरोबरीत सुटलेल्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात विकेट्च्या निर्णयावर वेंगुर्ला संघ विजयी ठरला. वेंगुर्ले संघाचा फलंदाज हर्षल परब याने या सामन्यात बहारदार खेळी केली. कणकवली संघानेही आपल्या उत्कृष्ट केळीच्या जोरावर शेवटपर्यंत झुंज दिली.अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करताना सावंतवाडी संघाने मर्यादित चार षटकांमध्ये केवळ २६ धावा केल्या. त्यानंतर हर्षल परब व अन्य फलंदाजांच्या फलंदाजीच्या जोरावर वेंगुर्ले संघाने सावंतवाडी संघावर मात करीत सलग दुसऱ्या वर्षी बाळशास्त्री जांभेकर चषकावर आपले नाव कोरले. तर संपूर्ण स्पर्धेत चमकदार कामगिरी करणारा सावंतवाडी संघ उपविजेता ठरला.