कुडाळ येथे २९ जानेवारीपासून होणार जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धा

Google search engine
Google search engine

कुडाळ l प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी ७ एम बॅडमिंटन क्लब तर्फे जिल्हास्तरीय बॅडमिंटन २९ जानेवारी रोजी कुडाळ हायस्कूल बॅडमिंटन हॉल येथे स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

या स्पर्धेसाठी पुरुष व महिला गट असे ठेवण्यात आले असून पुरुष गटातील ४० वर्षावरील दुहेरी व ५० वर्षांवरील दुहेरी तर महिला गटात ४० वर्षावरील दुहेरी ही स्पर्धा युनिक्स मुव्हीज ३५० या कंपनीच्या शटलवर खेळवली जाईल. स्पर्धेतील प्रथम विजेत्या रोख रुपये २ हजार आणि चषक व उपविजेत्यास रोख रुपये १ हजार ५०० आणि चषक मंडळाकडून देण्यात येणार आहे ही स्पर्धा २९ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजल्यापासून सुरू केली जाणार आहे या स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क ३०० रुपये एवढा आहे यासाठी आपली नाव नोंदणी आधार कार्डसह ९५४५८९०८१३ मोबाईल क्रमांकावर संपर्क साधून करावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.