कणकवली | प्रतिनिधी : भाजपा नाटळ सांगवे विभागीय कार्यालय, व गोट्या सावंत मित्रमंडळ सांगवे, नाटळ, भिरवंडे दशक्रोशी ग्रामस्थांच्यावतीने आज रविवार २२ ते गुरुवार २६ जानेवारी या कालावधीत वार्षिक माघी गणेश जयंती उत्सव साजरा करण्यात होणार आहे. यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार २२ रोजी सकाळी १० वा. कनेडी विद्यालय येथे जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धा, सोमवार २३ रोजी स. ७ वा. कनेडी बाजारपेठ येथे युवा संदेश मॅरेथॉन स्पर्धा, रात्री ८ वा. मालवणी विनोदी नाटक ‘सोडला तर पळता, मंगळवार २४ रोजी दु. ३ वा. भाजपा कार्यालयात हळदीकुंकू, सायं. ६ वा. श्रींच्या मूर्तीचे सवाद्य मिरवणुकीने आगमन, सायं. ७ वा. हरिपाठ, रात्रो ८ वा. बुवा दुर्वास गुरव व बुवा संदीप पुजारे यांच्या डबलबारी भजनाचा सामना, बुधवार २५ रोजी स. ७ वा. श्री गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना व पूजन, ८.३० ,त्यानंतर सत्यनारायण पूजा,११.३० वाजता आरती,तीर्थ प्रसाद ,दुपारी १२ वा. पासून महाप्रसाद, दु. २ वा. पासून अभिषेक शिरसाट, अमेय आर्डेकर, गिरीश घाडीगावकर यांची भजने, सायं. ६ वा. हभप सौ. नम्रता निमकर (पुणे) यांचे कीर्तन, ७ वा. दिंडी भजन, रात्रो ९ वा. विनोदी नाटक ‘वाकडी तिकडी’, गुरुवार २६ रोजी रात्रो १२ ते पहाटे ५ वा. भजने, पहाटे ५ वा. काकड आरती, स. ८ वा. श्रींची पूजा, ९ ते १२ वा. चिन्मय सावंत व योगेश पांचाळ यांची भजने, दु. १२.३० वा. आरती व नैवेद्य, दु. २ वा. दशावतारी नाटक ‘कर्णपिशाच्च’ सायं. ५.३० वा. श्रींची आरती व त्यानंतर विसर्जन मिरवणूक असे कार्यक्रम होणार आहेत. या उत्सवास उपस्थित राहण्याचे आवाहन जि. प. माजी अध्यक्ष गोट्या सावंत, जि.प. माजी अध्यक्षासौ. संजना सावंत व विभागातील भाजपा कार्यकत्यांनी केले आहे.
Home सिंधुदुर्ग कणकवली सांगवे, नाटळ, भिरवंडे विभागीय कार्यालय रौप्य महोत्सव आणि गणेश जयंती उत्सव सुरू