माखजन | वार्ताहर : आंबव पोंक्षे गावचे सुपुत्र व श्री सूर्यनारायण संस्थेचे माजी अध्यक्ष सुरेश दत्त्तात्रय पोंक्षे निवर्तले. ते ८३ वर्षांचे होते. मुंबईतील दादर येथील सुश्रुषा रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.अल्पशा आजाराने त्यांचे निधन झाले.सुरेश पोंक्षे यांचे प्राथमिक शिक्षण आंबव पोंक्षे मराठी शाळा तर माध्यमिक शिक्षण माखजन इंग्लिश स्कूल मध्ये झाले.ते बँक ऑफ महाराष्ट्र मधून डेप्युटी जनरल मॅनेजर म्हणून सेवानिवृत्त झाले.
नोकरी साठी मुंबईस्थित असले तरी आंबव पोंक्षे गांवातील श्री सूर्यनारायण मंदिरातील वार्षिकोत्सवास ते पूर्णवेळ उपस्थित असत.गोकुळाष्टमी,शिमगोत्सव,सूर्यनारायणाचा वाढदिवस उत्सव आदिना ते नियमित उपस्थित असत.उत्सवांमध्ये ते सक्रिय सहभागी असत.नोकरी निमित्त व गावामध्ये त्यांचा गाढा संपर्क होता.त्यांच्या पश्चात पत्नी,मुलगा,मुलगी नातवंडे असा परिवार आहे.त्यांच्या जाण्याने श्री सूर्यनारायण संस्थेचे अध्यक्ष श्री अशोक पोंक्षे यांनी शोक व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली.