मंडणगड | प्रतिनिधी : अण्णासाहेब सावंत महाड अर्बन कॉपीरेटिव्ह बँकेच्या मंडणगड शाखेत बँकेचे संस्थापक अण्णासाहेब सावंत यांची 84 व्या जंयत्ती दिनाचे निमीत्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास बँकेचे संचालक अँड राकेश साळुंखे, नगराध्यक्षा अँड. सोनल बेर्डे, नगरसेवक आदेश मर्चंडे, नगरसेविका सेजल गोवळे, उद्योजक श्रीपाद कोकाटे, वसीम चिपोलकर, किशोर देवकर, जयेंद्र दुसार शाखेचे व्यवस्थापक जयराम तांबे, लेखापाल कौस्तुभ देवकर, लिपीक प्रशांत मर्चंडे आदी मान्यवर उपस्थित होते. संचालक अँड राकेश साळुंखे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या कार्यक्रमाचे प्रस्तावीक व्यवस्थापक जयराम तांबे यांनी केले कोव्हीड काळात बँकेने तालुक्यातील जनतेकरिता शाखेने केलेल्या कामांचे संचालक अँड राकेश साळुंखे यांनी यावेळी विशेष कौतूक केले.
तसेच रायगड मधील लोकप्रिय बँकेचे प्रतिनिधित्व करण्याची संधी शोभाताई सावंत व खासदार सुनीलजी तटकरे यांनी माझ्या सारख्या सर्व सामान्य नागरीकाला दिली याचे आभार मानले कै. अण्णासाहेब सावंत यांना अभिप्रीत असलेल्या सामान्याची पत निर्माण करण्याचे काम तालुका शाखा करित असल्याने सर्वसामान्य आपलीशी वाटणारी बँक असा लौकीक शाखेने मिळवीलेला असल्याचे सांगताना कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामाचे विशेष कौतूक केले चालु आर्थीक वर्षात बँकेने अ वर्ग प्राप्त केला असून नफा मिळवीला बँकेच्या माध्यमातून तालुक्यातील बेरोजगार युवकांनी स्वयंरोजगाराच्या माध्यमातून उभे करण्यासाठी आगामी काळात वेगवेगळे उपक्रम राबवीले जाणार असल्याचे यावेळी सांगीतले. या कार्यक्रमाचे औचीत्यसाधून शाखेतील सर्व कर्मचाऱ्यांचा संचालक अँड राकेश साळुंखे यांनी मान्यवरांच्या हस्ते सत्कार केला. यावेळी श्रीपाद कोकाटे आदेश मर्चंडे सेजल गोवळे जयेंद्र दुसार यांनी मनोगत व्यक्त करताना बँकेच्या लोकाभीमुख कारभाराबद्दल समाधान व्यक्त केले.