एस एस पी एम इंजिनिरिंग कॉलेज कणकवली येथे नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी फ्रेशर्स पार्टीचे नुकतेच आयोजन विद्यार्थ्यांकडून करण्यात आले होते.नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी स्नेहपूर्ण वातावरण तयार होऊन त्यांच्या मनातील इंजिनिअरिंग बद्दलची भीती दूर व्हावी आणि त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या संदर्भात प्राचार्य डॉ. अनीश गांगल व प्रशासकीय अधिकारी श्री. शांतेश रावराणे यांच्या उपस्थितीत कार्यक्रमास सुरुवात झाली. या प्रसंगी जेष्ठ विद्यार्थ्यांनी पारंपारिक नृत्य, रॅम्प वॉक , वेस्टर्न डान्स , गायनातून नवीन विद्यार्थ्यांचे स्वागत केले व सर्व नव विद्यार्थ्यांनी स्वतःचा परिचय करून दिला. विविध प्रकारच्या खेळांच्या आयोजनांनी विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित केला. दिवसभराच्या कार्यक्रमाच्या नियोजनामध्ये विद्यार्थ्यांचे सुप्तगुण, आत्मविश्वास तसेच त्यांमध्ये आपुलकीची भावना निर्माण व्हावी या पद्धतीने वेगवेगळ्या राऊंड्सचे आयोजन करण्यात आले होते. मेकॅनिकल विभागाचे प्रा. कल्पेश कांबळे व ए.आय.एम.एल. विभागाच्या विभागप्रमुख प्रा. सौ. सुप्रिया नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली मिस्टर फ्रेशर म्हणून कु. प्रथमेश भिके व मिस फ्रेशर कु. वैभवी गिरकर यांची निवड करण्यात आली, यावेळी उपस्थीतांनी टाळ्यांच्या कडकडाटाने आनंद व्यक्त केला. हा सोहळा उत्साहात पार पाडण्यासाठी अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमात सर्व विद्यार्थ्यांनी अतिशय आनंदाने व उत्साहाने सहभाग नोंदवला व भरघोस प्रतिसाद दिला.सदर कार्यक्रमासाठी SSPM संस्थेचे संस्थापक केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे, अध्यक्षा सौ. निलमताई राणे, उपाध्यक्ष माजी खा. निलेश राणे, सचिव आ. नितेश राणे, प्रा. डॉ. अनीश गांगल, उपप्राचार्य डॉ. महेश साटम व प्रशासकीय अधिकारी शांतेश रावराणे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी प्रोत्साहन दिले.
Home सिंधुदुर्ग कणकवली इंजिनिरिंग कॉलेज, कणकवली येथे फ्रेशर्स पार्टीमधून नवगतांचा स्वागत सोहळा उत्साहात साजरा…













