लायन्स आय हॉस्पिटल, ग्रुप ग्रा.पं. निवळी यांच्या मोफत आरोग्य शिबिराला लोकांचा प्रतिसाद

Google search engine
Google search engine

रत्नागिरी : तालुक्यातील निवळी गावामध्ये दिवालीबेन मोहनलाल मेहता लायन्स आय हॉस्पिटल रत्नागिरी आणि ग्रुप ग्रामपंचायत निवळी यांच्या संयुक्त विद्यमाने पिरामल स्वास्थ्य मोफत आरोग्य शिबिराला मोठ्या संख्येने लोकांनी उपस्थिती दर्शवली.हे शिबीर यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायत सरपंच सौ तन्वी कोकाजे,उपसरपंच श्री संजय निवळकर,सदस्य सौ स्वेता तोडकर,श्री दशीन गावडे,श्री संतोष मालप,सौ श्रुतिका गावडे,पोलीस पाटील श्री शितप,श्री विनय मुकादम,श्री विवेक मुळ्ये,श्री गणपत कारकर,श्री सुनील गावडे,श्री सुभाष मालप,श्री सुरेश कारकर,ग्रामसेवक श्री कुंभार,आरोग्य सेविका केतकर मॅडम आणि ग्रामस्थांनी खूप मेहनत घेतली.