चिपळूण | वार्ताहर : बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाच्या उत्तर रत्नागिरी जिल्हा समन्वयक पदी कुणबी समाजाचे कार्यकर्ते आणि सामाजिक बांधिलकी जोपासणारे शशिकांत वाघे यांची निवड झालेली आहे. त्यांच्या निवडीबद्दल सर्वांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. चिपळूण तालुक्यातील निर्व्हाळ गावचे सुपुत्र आणि राजकारणासह सामाजिक कामांमध्ये अग्रेसर असणारे श्री वाघे यांनी केलेला आतापर्यंतच्या कामाची दखल घेत त्यांची बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाच्या उत्तर रत्नागिरी जिल्हा समन्वय पदी निवड करण्यात आली आहे. पूर्वीपासून मुख्य शिवसेनेच्या प्रवाहात असताना आणि आता बाळासाहेबांची शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्यावर सोबत असणारे शशिकांत वाघे यांची दखल घेतली गेली आहे. त्यांना जिल्हा समन्वयक निवड पदाचे पत्र सुद्धा देण्यात आले आहे. पालकमंत्री उदय सामंत, बाळासाहेबांची शिवसेनेचे नेते रामदास भाई कदम आणि इतर नेते पदाधिकारी यांच्या मार्गदर्शाखाली जनतेचे प्रश्न सोडणार असल्याचे श्री वाघे यांनी सांगितले. त्यांच्या निवडीबद्दल सर्वांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.