रत्नागिरी जिल्ह्यातील सहा नवोपक्रमशील शिक्षकांना सर फाउंडेशनचा राष्ट्रीय इनोव्हेशन अवार्ड जाहीर

दापोली | प्रतिनिधी

स्टेट इनोव्हेशन अँड रिसर्च फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांनी नुकतीच राष्ट्रीय स्तरावर नवोपक्रमशील प्राथमिक व माध्यमिक शिक्षक, अधिकारी यांच्यासाठी नवोपक्रम स्पर्धा ऑक्टोबरमध्ये आयोजित केली होती, या स्पर्धेत रत्नागिरी जिल्ह्यातील सहा शिक्षकांना राष्ट्रीय स्तरावर इनोव्हेशन अवार्ड जाहीर झाले आहेत यामध्ये
प्राथमिक विभागातून
श्री. शामराव सखाराम चाटसे (उपशिक्षक) जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा कांगवई गवळवाडी ता. दापोली
उपक्रम :- मी लिहिणार मी वाचणार – उपक्रमाचे 24 दिवस – ताळेबंदी नंतर पुनःश्च श्रीगणेशा,

संतोष दत्ताराम जाधव (पदवीधर शिक्षक) जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक मराठी शाळा धामनदिवी नं. १, ता. खेड
उपक्रम :- लर्न इंग्लिश विथ ड्रामा

शरद तुकाराम कुराडे (प्राथमिक शिक्षक) जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक मराठी शाळा धामनदिवी नं. १, ता. दापोली
उपक्रम :- शालेय रोपवाटिका – ध्यास पर्यावरण संवर्धनाचा

श्री. नारायण नानाराम शिंदे (उपशिक्षक) जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा वाडावेसराड ता. संगमेश्वर
उपक्रम :- वाचन गती वाढवण्यासाठी कृतीयुक्त संगीतमय चौदाखडीचा प्रयोग,

सौ. मधुरा रामदास तेटांबे (उपशिक्षक) जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा मांडकी बौद्धवाडी ता. चिपळूण
उपक्रम :- नव्या युक्त्या देती, इंग्रजी वाचनास गती

माध्यमिक विभागातून
श्री. योगेश चंद्रकांत नाचणकर
न्यू इंग्लिश स्कुल चिंचघरी सती ता. चिपळूण
उपक्रम – विद्यार्थ्यांना डिजिटल माध्यमाद्वारे आनंददायी शिक्षण
अशा रत्नागिरी जिल्ह्यातील सहा शिक्षकांना हे पुरस्कार सर फाउंडेशन आयोजित मार्च मध्ये होणाऱ्या राष्ट्रीय शिक्षण परिषदेत प्रदान करण्यात येणार आहेत. याबद्दल राज्य समन्वयक श्री. सिद्धाराम माशाळे, श्री. बाळासाहेब वाघ, सौ. हेमा शिंदे, श्री. राजकिरण चव्हाण, जिल्हा समन्वयक श्री. संतोष जाधव , श्री. विनय राणे यांनी अभिनंदन केले.