शेट्येनगर स्फोट प्रकरणातील घरमालक अशफाक काझी यांचा मृत्यू

Google search engine
Google search engine
स्फ़ोटातील मृतांची संख्या 3

रत्नागिरी : प्रतिनिधी

बुधवारी पहाटे शहरानजिकच्या शेट्येनगर येथील चाळीत झालेल्या अतिशय शक्तीशाली स्फोटाने गंभीर भाजलेल्या घरमालक अशफाक काझी यांचा उपचारादरम्यान कोल्हापूर येथील शासकीय रुग्णालयात रविवारी रात्री 10 वाजता मृत्यू झाला. त्यामुळये एकूण मृतांची संख्या तीन झाली आहे.

गॅसच्या स्फोटामुळे चाळीचा स्लॅब उडाला होता तर कोसळलेल्या स्लॅबखाली सापडून अशफाक काझी यांची पत्नी कनिज काझी, सासू नुरूनिस्सा अलजी यांचा मृत्यू झाला होता . तर अशफाक काझी गंभीर भाजल्याने त्यांना कोल्हापुर येथील सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार सुरू असताना रविवारी रात्री दहा वाजता त्यांचा मृत्यू झाला.