जानवळे वाणीवाडी येथील श्रीगणेश मंदीरात माघी गणेशोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

पाटपन्हाळे | योगेश तेलगडे : गुहागर तालुक्यातील जानवळे वाणीवाडी येथील श्रीगणेश मंदीरामध्ये श्री गणेश मंदीर जानवळे देवस्थानच्या वतीने माघी गणेशोत्सवाचे २५ वे वर्षे असुन सदर सोहळा सोमवार दि. २३ जानेवारी ते गुरुवार दि. २६ जाने २०२३ पर्यंत साजरा करण्यात येणार आहे. सोमवार दि. २३ जानेवारी रोजी दुपारी १२.३० वा. आरती, दुपारी १ वा. महाप्रसाद, दुपारी २.३० वा. श्रीसत्यविनायक पुजा, रात्रौ ८.३० वा. प्रवचन – ह.भ.प. मोहन भाई संसारे, रात्रौ ८.३० वा.महाप्रसाद, रात्रौ १० नंतर श्री कमळेश्वर नवतरुण भजन मंडळ जानवळे यांचे भजन, मंगळवार दि. २६ जानेवारी रोजी सकाळी ८.३० वा. गणेश यज्ञयाग, दुपारी १२.३० वा. आरती, दुपारी १ वा. महाप्रसाद, सायं वा.७.३० वा. आरती व श्री गणेश नामजप रात्री ८.३० वा. महाप्रसाद, भजन, बुधवार दि. २४ जानेवारी रोजी सकाळी ८ वा. श्रींची सकाळची महाभारती, सकाळी ११ वा. जन्मोत्सव किर्तन किर्तनकार ह.भ.प. श्रीराम वसंत देवस्थळी जानवळे, दुपारी १२.३० वा. सामुदायिक आरती, दुपारी १ वा. महाप्रसाद, सायं.५ वा. श्रींची पालखी मिरवणुक, सायं. ७ वा महाआरती, रात्री ८ वा. श्रीगणेश नामजप , रात्रौ ८.३० वा. महाप्रसाद, रात्रौ ९ वा. श्रीसत्यनारायण प्रासा. भजन मंडळ वेळणेश्वर यांचे भजन, रात्री १०.३० वा. सांस्कृतिक कार्यक्रम, गुरुवार दि. २६ जानेवारी रोजी सकाळी १० वा.श्रीसत्यनारायण महापुजा व तीर्थ प्रसाद, दुपारी १ वा. महाप्रसाद, सायं ४ वा महिलांचे हळदी कुंकू समारंभ , सायंकाळी ७ वा. आरती व श्री गणेशा नामजप, रात्रौ ८ वा.दत्तगुरु भजन मंडल जानवळे मधलीवाडी यांचे भजन, रात्री ८.३० वा. महाप्रसाद आदी कार्यक्रम पार पडणार आहेत. तरी या सोहळ्यासाठी भाविकांनी उपस्थित रहावे असे आवाहन श्री गणेश मंदीर जानवळे देवस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.