मंडणगड शहरात पेट्रोल व डिझेल चा पुरवठा अनियमीत

Google search engine
Google search engine

नगरपंचायत विरोधी गटनेता विनोद जाधव यांचे तहसिलदारांना निवेदन

मंडणगड | प्रतिनिधी : मंडणगड शहरातील पंपामध्ये पेट्रोल व डिझेल या इंधनाचा अनियमीत पुरवठा होत असल्याने तालुक्यातील नागरीकांना विविध समस्याना सामोरे जावे लागत असल्याने नगरपंचायत विरोधी गट नेता व बाळासाहेबांची शिवसेना शहरप्रमुख विनोद जाधव व मंडणगड शहर रिक्षा चालक मालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी 23 जानेवारी 2023 यांनी तहसिलदार विजय सुर्यंवंशी यांची भेट घेत ही समस्या सोडवण्यासाठी निवेदन सादर केले. तहसिल कार्यालयात सादर करण्यातील निवेदनातील माहीतीनुसार गेले अनेक दिवस तालुक्यातील पेट्रोल पंपामध्ये पेट्रोल व डिझेलचा पुरवठा अनियमीतपणे सुरु आहे. शहरातील पंपामध्ये अनेक वेळा इंधन संपल्याची पाटी लागलेली असते त्यामुळे तालुक्यातील सर्व स्तरातील व्यापार, उद्योग, रिक्षा व्यवसाय व नागरीकांची गैरसोय झाली आहे. इंधनाअभावी जनजीवन प्रभावीत झाले आहे. इंधन नसल्याने अनेकांचे व्यवसाय ठप्प झाले आहेत. तरी या विषयाकडे गांभीर्याने लक्ष घालून संबंधितांना योग्य त्या सुचना देवून गैरसोय दूर करावी अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. या निवेदनावर मंडणगड रिक्षा चालक मालक संघटनेचे अध्यक्ष विनोद जाधव, उपाध्यक्ष बाबूरावे दुर्गवले, विश्वास शिंदे, सचिव विक्रांत घैसास, उपसचिव राकेश शिंदे, खजिनदार अनंत चिले, विशाल जाधव, तुकाराम पाडवे, रामजी माळी, महेंद्र कदम, इरफान निरबाडकर, कृष्णा राजविलकर, अमित जाधव, चंद्रकांत पंदीरकर, अरुण तांबे, राकेश पोतदार, महेंद्र बैकर, सुर्यकांत महाडीक, मंगेश नटे, समिर सापटे, दत्ताराम महाडीक यांच्या सह्या आहेत.