मंडणगड | प्रतिनिधी : माघी पौर्णिमेच्या निमीत्ताने धुत्रोली हनुमानवाडी येथील गणपती मंदिरात 25 जानेवारी 2023 रोजी श्री. माघी गणेश जयत्ती उत्सव, सत्यनारायणाची महापुजेचे आयोजन करण्यात आले आहे. यात अभिषेक महाआरती, सत्यनारायणाची महापूजा, जन्म सोहळा, अनंत येलमकर यांच्यावतीने महाप्रसाद हे कार्यक्रम सकाळच्या सत्रात संपन्न होणार आहेत दुपारी गंमत जंमत कार्यक्रम सायंकाळी सत्काराचा कार्यक्रम आयोजीत कऱण्यात आला आला आहे. प्रभोती घागरुम कोन्हवली श्वोक सुगदरे धुत्रोली, जान्हवी खापरे शेडवई या गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष गौरव करण्यात येणार आहे. धुत्रोली येथील चव्हाण कुटुंबीयांचेवतीने रात्री महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला आहे. ह.भ.प. अशोक पवार बडोदा यांच्या किर्तनाचा कार्यक्रमही आयोजीत करण्यात आला आहे. भाविकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन गणेश सेवा मंडळ धुत्रोली हनुमानवाडीचे ग्रामिण अध्यक्ष संजय सुगदरे, मुंबई अध्यक्ष दिलीप मळेकर, महिला अध्यक्षा सौ. विनिता सुगदरे यांनी केले आहे.