देव्हारे पंचक्रोशी माध्यमीक हायस्कुलमध्ये वार्षीक पारोतीषीक वितरण व विविध गुणदर्शन कार्यक्रम संपन्न

Google search engine
Google search engine

मंडणगड | प्रतिनिधी : देव्हारे पंचक्रोशी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय देव्हारे येथे 21 जानेवारी 2023 रोजी वार्षिक स्नेह सम्मेलनाचे निमीत्ताने पारितोषीक वितरण व विविध गुण दर्शन कार्यक्रमाचे आयोजीन करण्यात आले होते. या निमीत्ताने आयोजीत सत्कार समारंभाचे अध्यक्षस्थान आर व्ही बेलोसे एज्युकेशन फाउंडेशन दापोलीच्या सभापती श्रीमती जानकी बेलोसे यांनी भुषविले. कार्यक्रमास श्री कासम महालदार, धनंजय यादव, किरण काशीकर व महाविद्यालयाचे मुख्याध्यापक रामचंद्र कापसे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवातीस महाविद्यालयाचे प्राचार्य श्री रामचंद्र कापसे यांनी प्रास्ताविक केले. या कार्यक्रमा मध्ये आजी -माजी विद्यार्थी संघटनेच्या प्रकाशीत कऱण्याचे आलेल्या दिनदर्शिकेचे प्रकाशन कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. विविध गुण दर्शन कार्यक्रमा‌मध्ये प्रशालेतील विद्यार्थ्यांनी रेकॉर्ड डान्स, पोवाडा, लावणी,भिम गित सादर केली. या कार्यक्रमासाठी पंचक्रोशी येथील बहुसंख्य नागरिक व विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमांसाठी सभापती श्रीमती – जानकी बेलोसे मॅडम यांनी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमा साठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते.