प्रभावी वक्ता होण्यासाठी वाचन चिंतन आणि मनन गरजेचे : प्रा.वैभव खानोलकर

Google search engine
Google search engine

खारेपाटण । प्रतिनिधी : लोकशाहीत अभिव्यक्त होणे गरजेचे असते आपल्या महाराष्ट्राला वैचारिक परंपरा लाभलेली आहे तीच परंपरा जपण्याचे कार्य हा वक्तृत्व स्पर्धेतील विविध भागातुन आलेल्या विद्यार्थी जपतील आणि वक्त्यातुनच उद्याचे वक्ते निर्माण होतील, अशी भावना प्रा. वैभव खानोलकर यांनी व्यक्त केली.
खारेपाटण महाविद्यालयात स्वातंत्र्यवीर सैनिक गुरुवर्य वीर शंकरराव पेंढारकर यांच्या जंयती निमित्ताने झालेल्या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा नुकतीच कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय खारेपाटण येथे संपन्न झाली.
यावेळी महाराष्ट्रातुन अनेक महाविद्यालयीन विद्यार्थी सहभागी झाले होते या स्पर्धेच्या परिक्षणाचे काम नेमळे पंचक्रोशी उच्च माध्यमिक विद्यालयाचे व न्यु इग्लिश स्कुलचे अध्यापक वैभव खानोलकर यांनी केले. यावेळी परिक्षक या नात्याने प्रा.खानोलकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

यावेळी त्यांनी स्पर्धकांना देण्यात आलेल्या विषय खुपच चिंतनशील आणि सखोल अभ्यासपुर्वक मांडण्यांचे होते तर काही विषयावर बोलताना निर्भय पणे बोलायचे होते.आज अशा प्रकारच्या आव्हानात्मक विषयाची मंथन करण्याची गरज आहे, असे हि मत व्यक्त केले.या आयोजनात या कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कांबळे सर ,प्रा.गोंधडे सर,प्रा,शिंदे सर ,प्रा.सय्यद सर प्रा.सुर्वे मॅडम आदी सर्व प्राध्यापक वर्ग ही उपस्थित होते.