कोकण अमृत बहुउद्देशीय कृषी प्रोड्यूसर कंपनी लि लांजा मार्फत आयोजन
लांजा | प्रतिनिधी : कोकण अमृत बहुउद्देशीय कृषी प्रोड्यूसर कंपनी लि लांजा या शेतकरी उत्पादक कंपनीचा शेअर सर्टिफिकेट वितरण तसेच ओले काजू सोलण्याचे मशीन प्रशिक्षण आणि हळदीकुंकू समारंभ असा संयुक्त कार्यक्रम भांबेड येथे पार पडला कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी रत्नागिरी जिल्हा परिषद सदस्य दत्ता कदम होते. तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी कंपनीचे कार्याध्यक्ष गोपिनाथ पवार होते .ओले काजू सोलण्याचे मशीन प्रशिक्षण देण्यासाठी मान्यवर म्हणून फणसकिंग ,उद्योजक मिथिलेश देसाई आणि प्रगतिशील शेतकरी अमर खामकर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुञसंचालन कंपनीचे संचालक अनंत शिंदे यांनी केले.कार्यक्रमाची प्रस्तावना कंपनीचे सचिव रविंद्र खामकर यांनी मांडली.कंपनी अल्पवधीतच तालुक्यातील शेतक-यांच्या विश्वासास पाञ ठरल्याचे सांगितले.शासकीय मापदंडाप्रमाणे नियत कालावधीत भागधारक सभासदांना शेअर सर्टिफिकेट वितरण करून कंपनीने सन्माननीय भागधारक सभासदांचा विश्वास संपादन केला आहे.आता काजू चा सिझन आहे.तुम्ही कोणत्याही पदार्थाचे उत्पादन करा.कंपनी त्यास बाजार पेठ उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न करणार आहे.कंपनी शेतकरी आणि महिला बचत गटांना आर्थिक सक्षम करण्यासाठी प्रयत्नशील आहे. बंधूनो, कंपनीची खूप मोठी ध्येय आणि उदिष्ट्ये आहेत,आणि ती साद्य करण्यासाठी आपले योगदान आणि सहकार्य महत्वाचे आहे.
त्यानंतर उपस्थित कंपनीच्या भागधारक सभासदांना मान्यवरांचे हस्ते शेअर सर्टिफिकेट चे वितरण करण्यात आले. यावेळी मिथिलेश देसाई यांनी ओले काजू सोलण्याचे मशीनचे प्रात्यक्षिक देताना असेसंगितले की जगातील पहिलाच अशाप्रकारच्या मशीनचा शोध आपल्या लांजा तालुकयातील शेतकरी श्री. खेर यांनी लावला आहे. आणि याचा फायदा सर्व शेतकऱ्यांना होणार आहे. मशीन चे प्रशिक्षण दहा-दहाच्या गटा गटाने उपस्थितांना दिले.तसेच उपस्थित शेतक-यांनी विचारलेल्या प्रश्नांची समर्पक उत्तरे दिली या मशीन ची मागणी ही बुक करण्यात आली.तसेच एक मशीन सौ सुवर्णा शशीकांत पावसकर यांनी विकत घेतली.
प्रमुख पाहुणे दत्ता कदम यांनी कंपनीचे कौतुक करताना सांगितले की, अगदी अल्पवधीतच कंपनी ने २५० सभासदांचे टार्गेट पुर्ण करुन आपल्या सभसदांना शेअर सर्टिफिकेट वितरण केले.तुमच्या साठी कंपनी एक पाऊल पुढे टाकणार आहे, पण त्यासाठी तुम्ही पुढे आले पाहीजे.कंपनीचे सभासद झाले पाहिजे.सभासद व्हा आणि कंपनी सोबत काम करुन आपला उत्कर्ष करुया.असे उपस्थितांना आवाहन केले. आपल्या अध्यक्षयी भाषणात गोपिनाथ पवार यांनी उपस्थित सर्वांचे अभिनंदन करुन तुम्ही जे काही बनवाल, त्याचे मार्केटिंग कंपनी करेल, शासकीय माध्यमातून तुम्हाला प्रशिक्षण दिले जाईल. असे सांगितले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कंपनीचे अध्यक्ष मंगेश वालकर, कार्याध्यक्ष गोपिनाथ पवार, सचिव रविंद्र खामकर, खजिनदार चंद्रकांत दळवी , संचालक शशिकांत खामकर, रविकांत इंगावले , विजय तावडे , संजय तोडकरी ,सौ.नेहा मोरे , सौ.प्रांजल कोलते , मनोहर पांचाळ , अनंत शिंदे कार्यकारी अधिकारी दत्तप्रसाद कोलते , आणि आॕफीस कर्मचारी सौ.नम्रता साळुंखे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.*
आभार प्रदर्शन सह-सचिव मनोहर पांचाळ यांनी केले.