माखजनात आ.शेखर निकम यांच्या हस्ते विविध कामांचे भूमिपूजन

माखजन |वार्ताहर :   संगमेश्वर तालुक्यातील माखजन गावात आमदार शेखर निकम यांच्या हस्ते शासनाच्या विविध योजनांतर्गत उपलबद्ध करून दिलेल्या विकास निधीतून करण्यात येणाऱ्या विकास कामांचे भूमीपूजन करण्यात आले.यावेळी मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते.

माखजन गावासाठी गणेश विसर्जन घाट व जेटी बांधणे, बाजारपेठ रस्ता काँक्रिटिकरण करणे, मोहल्ला कब्रस्तानला संरक्षक भिंत बांधणे, त्यासोबतच रांजणेवाडी, कबुतर मोहल्ला व राधाकृष्ण मंदिर रस्ता डांबरीकरण करणे आदी विकास कामांची भूमिपूजन करण्यात आली. यापुढेही माखजन गावातील विकासासाठी आपण प्रयत्नशिल राहून अधिकाधीक विकासात्मक कामे करण्यासाठी आपण कटिबद्ध राहू असे प्रतिपादन आमदार निकम यांनी केले.

यावेळी सरपंच महेश बाष्टे, उपसरपंच पुजा डेरे, राजेंद्र सुर्वे, राजेंद्र पोमेंडकर, प्रकाश रेडीज, अजिज आलेकर,सूर्यकांत उर्फ बापू वर्तक,शेरे आलम खोत, शैलेश धामणस्कर, हनिफ म्हाते, जाकिर शेकासन, शेखर उकार्डे, गणपत चव्हाण, सुशिल भायजे, रमाकांत घाणेकर, शशिकांत घाणेकर, नाना कांगणे, दिपक जाधव, मूल पिरधनकर, किशोर तांबटे, सुबोध चव्हाण, कांता धामणकर, सिद्धार्थ पवार, संतोष गोटेकर, रुपेश गोताड, भाई मोरे, अनिल जाधव व ग्रामस्थ आदी उपस्थित होते.