सावंतवाडी । प्रतिनिधी : सावंतवाडी शहरातील सुप्रसिद्ध बाळकृष्ण कोल्ड्रीक्सच्या माध्यमातून ‘बाळकृष्ण नॅचरल आईस्क्रीम पार्लर’ हे नवे दालन चेतन नेवगी व सौ. शांता नेवगी यांच्या माध्यमातून चिटणीस नाका येथे सुरू करण्यात येत आहे. बुधवारी २५ जानेवारी रोजी माघी गणेश जयंतीच्या शुभमुहूर्तावर या नव्या दालनाचे उद्घाटन होणार आहे.
या नव्या आईस्क्रीम पार्लरमध्ये चिकू, गुलकंद, रोस्टेड आलमंड, सिताफळ, ऑरीओ आदी फ्लेवरच्या आईस्क्रिमची चव चाखता येणार आहे. कोणत्याही प्रकारची इसेन्स न वापरता साखर, दुध व फळांच्या माध्यमातून हे फ्लेवर तयार केले जाणार आहेत. बाळकृष्ण कोल्ड्रींक्सच्या माजगाव येथिल फॅक्टरीत हे आईस्क्रिम तयार केले जाणार असून आईस्क्रीमचा ब्रँड बाळकृष्णच राहणार असून हे नॅचरल आईस्किम आईस्क्रीम लव्हर्सच्या पसंतीस उतरणार यात शंका नाही.
बाळकृष्ण कोल्ड्रिंकमधील कॉकटेल, आईस्क्रीम, मिल्कशेकसह अन्य पदार्थांची चव चाखल्याशिवाय सावंतवाडीच्या शहरात येणारे पर्यटक सहसा परत जात नाहीत. बाळकृष्णच्या मॅंगो, व्हेनिला, पिस्ता व चॉकलेटसह अन्य फ्लेवरला तर तोडच नाही. विशेष म्हणजे हे आईस्क्रीम बाळकृष्ण कोल्ड्रिंकच्या माजगाव येथील आईस्क्रीम फॅक्टरीत बनवलं जातं. सुसज्ज असा कोल्डरूम, मशीनरी, फॅक्टरी असणाऱ्या बाळकृष्ण कोल्ड्रिंकनं आईस्क्रीम जगतात जिल्ह्यात आपला ब्रँड तयार केलाय.
सन १९६५ सालापासून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिलं कोल्ड्रिंक हाऊस सावंतवाडीत बाळकृष्णच्या माध्यमातून कार्यरत आहेत. आईस्क्रीम लव्हर्संसना विविध फ्लेवर्स मधलं मनपसंत व चविष्ट आईस्क्रीम खाऊ घालतात. याच सोबत आता बाळकृष्ण कोल्ड्रीक्सच्या माध्यमातून ‘बाळकृष्ण नॅचरल आईस्क्रीम पार्लर’ आईस्क्रीम लव्हर्ससाठी घेऊन आले आहेत.
बुधवारी २५ जानेवारी रोजी या पार्लरचा शुभारंभ होत आहे. या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित राहून नॅचरल आईस्क्रीम पार्लरमधील आईस्क्रीमच्या नवनवीन व्हरायटीची चव चाखावी, असे आवाहन चेतन नेवगी, सौ. शांता नेवगी व समस्त नेवगी कुंटुबियांच्यावतीने करण्यात आले आहे.