विश्वभूषण भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात नेताजी सुभाषचंद्र बोस आणि बाळासाहेब ठाकरे जयंती उत्साहात साजरी …

Google search engine
Google search engine

मंडणगड | प्रतिनिधी : मुंबई विद्यापीठ संचलित, विश्वभूषण भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात नेताजी सुभाषचंद्र बोस आणि बाळासाहेब ठाकरे जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी आयोजित कार्यक्रमात बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस सहा. प्रा. अनिता पाटील आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेस सहा. प्रा. राजेंद्र राऊत यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. महाविद्यालयातील विद्यार्थी कु. अदिती देठे, कु. वैभवी चौगुले आणि विपुल राले यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जीवन कार्यावर आपले विचार व्यक्त केले. त्यानंतर सहा. प्रा. अरुण ढंग यांनी नेताजी सुभाष चंद्र बोस आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवन कार्यातील प्रमुख घटनांवर तपशील देत आपले विचार व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे नियोजन महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागामार्फत केले होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन द्वितीय वर्ष बीएमएस मधील विद्यार्थीनी कु. पूनम धोत्रे तर आभार प्रदर्शन कु. ख़ुशी खैरे यांनी केले. महाविद्यालयातील शिक्षक, प्रशासकीय कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने या कार्यक्रमास उपस्थित होते.