73 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त शेती विषयक मार्गदर्शनाचा कार्यक्रम. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी स्तुत्य उपक्रम

कोकण नेस्ट व माधवाश्रम यांच्या संयुक्त विद्यमाने कोकण नेस्ट, निवेंडी येथे ध्वजारोहण.

रत्नागिरी : अनेक कृषी विषयक संशोधन, सगुणा बाग कर्जत येथील कृषी पर्यटन कल्पनेचे जनक, कृषिरत्न श्री. चंद्रशेखर भडसावळे कोकण नेस्ट, निवेंडी येथे यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण होणार आहे. त्यानंतर शेती विषयक मार्गदर्शनाचा आगळा वेगळा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

तालुक्यातील नवनिर्वाचित निवळी सरपंच सौ. तन्वी प्रशांत कोकजे, सदस्य सौ. ऋतुजा उमेश कुळकर्णी धामणसें, सौ. सिध्दी मंदार कानडे धामणसें या तीन महिलांचा प्रातिनिधिक स्वरूपात सत्कार आयोजित केला आहे.
तरी या कार्यक्रमाला पंचक्रोशितील शेतकरी व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन कोकण नेस्ट व माधवाश्रम च्या वतीने डॉ. चंद्रशेखर निमकर व सौ. गौरी वेलणकर यांनी केले आहे.