आर्किटेक्ट अभिषेक आजगांवकर यांच्या नूतन कार्यालयाचा भव्य शुभारंभ

कुडाळ । प्रतिनिधी : कुडाळ येथील प्रतिथयश वास्तूविशारद तथा आर्किटेक्ट व डिझायनर अभिषेक दिनेश आजगांवकर यांच्या कुडाळ

परशुरत्ना कॉम्प्लेक्स येथील नूतन कार्यालयाचा भव्य शुभारंभ सोहळा दिमाखात संपन्न झाला. कुडाळ नगरीच्या नगराध्यक्षा आफरीन करोल यांच्या हस्ते या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी आर्किटेक्ट मंदार परुळेकर, शेखर नाईक, दिनार शिरसाट, रोटरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲङ.राजीव बिले, रोटरी क्लबचे अध्यक्ष अमित वळंजू, शशिकांत चव्हाण, गजानन कांदळगावकर, वास्तू कन्सल्टंट शेखर

केळबाईकर, जिव्हाळा सेवाश्रमचे अध्यक्ष सुरेश बिर्जे, एल आय सी चे अधिकारी तथा अभिषेक आजगांवकर यांचे वडिल दिनेश आजगांवकर व आजगांवकर कुटुंबीय उपस्थित होते.

आकिटेक्ट अभिषेक आजगांवकर यांनी आपली पदवी पद्मभूषण वसंतदादा पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर, पुणे येथून प्राप्त केली. तर कर्नाटक मधील नामवंत आर्किटेक्ट बकुल जोशी यांच्याकडे २ वर्षे अनुभव घेतला. सद्यस्थितीत ते कुडाळ येथील प्रतिथयश वास्तू विशारद म्हणून ओळखले जातात. त्यांच्या या नूतन कार्यालय प्रसंगी सर्वांनी त्यांना नवीन वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

 Sindhudurg