25 वर्षे विनाअपघात सेवा करणाऱ्या रत्नागिरी आगारातील 19 चालकांचा एसटी सत्कार

Google search engine
Google search engine

रत्नागिरी | प्रतिनिधी : रा.प. महामंडळाच्या रत्नागिरी विभागातील १९ चालक कर्मचा-यांचा २५ वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक विनाअपघात सेवा केल्याबद्दल २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून विशेष गौरव सपत्नीक करण्यात आला. सदर सत्कार हा प्रभारी विभाग नियंत्रक मा. ए.पी. कुलकर्णी, विभागिय वाहतूक अधिकारी श्री. अनिल म्हेतर, उपयंत्र अभियंता श्री. रमाकांत शिंदे, विभागिय सांख्यिकी अधिकारी श्री. पवार, विभागिय अभियंता श्री. मोहिते, विभागिय कर्मचारी वर्ग अधिकारी श्री. राजकुमार भडाळे, विभागिय भांडार अधिकारी श्रीमती फुटाणे यांच्या उपस्थितीत पार पडला. त्यावेळी चालकांना स्मृतीचिन्ह, २५ वर्षाचा बिल्ला, प्रशस्तीपत्रक, तसेच त्यांच्या धर्मपत्नीला नारळ, साडी, खण देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच महामंडळाने सुरक्षित सेवा केलेल्या कर्मचा-यांना धनादेशाव्दारे रुपये २५,०००/- बक्षीस म्हणून प्रदान केलेले आहे.

सत्कार केलेल्या चालकांची नावे खालीलप्रमाणे:-

१. जहिर अब्दुल्ला हुनेरकर

४. नंदकुमार

७. विजय भोंगले

५. दिपक भाटकर

८. शरद नारकर

६. दिलीप जाधव

९. चंद्रकांत पावसकर

१०. संजय खटावकर

२. हिदायतउल्ला काझी

११. दिपक पिंपळे

३. राजाराम शिंदे
१२. विश्वनाथ बारसकर
१३. प्रकाश खानविलकर
१४. शिवाजी देवळेकर
१५. राजेंद्र खानविलकर

१६. विजय घाणेकर

१७. संजय चव्हाण

१८. चंद्रकांत कामत

१९. सुधीर कोलते