आबलोली | वार्ताहर : आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्त कृषि विभाग आणि बँक ऑफ महाराष्ट्र ग्रामीण विकास केंद्र भिगवण यांच्या संयुक्त विद्यमाने गुहागर तालुक्यातील मौजे काजुर्ली येथे प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. तृणधान्यांचे दैनंदिन आहारामध्ये महत्व आणि त्यातील पोषणमूल्ये याबाबत कृषि सहायक उमेश स्वामी यांनी महिलांना मार्गदर्शन केले.बँक ऑफ महाराष्ट्र चे प्रभारी अधिकारी उमेश निकम यांनी महिलांना नाचणीचे विविध मूल्यवर्धित पदार्थ तयार करण्याबाबत माहिती दिली. यावेळी काजूर्लीच्या सरपंच रुक्मिणी सुवरे,पोलिस पाटील सीमा लिंगायत, मंडळ कृषि अधिकारी श्रीमती भक्ती यादव, कृषि पर्यवेक्षक प्रभाकर जाबरे,बँक ऑफ महाराष्ट्र चे प्रभारी अधिकारी उमेश निकम, कृषि सहायक उमेश स्वामी यांसह गावातील ग्रामस्थ, महिला उपस्थित होते. कृषी सहायक उमेश स्वामी यांनी उपस्थितांचे आभार मानले.