वेंगुर्ले येथील रामेश्वर मंदिरात स्थापना केलेल्या २१ पार्थिव गणपतींचे विसर्जन

वेंगुर्ला | प्रतिनिधी : वेंगुर्ले येथील ग्रामदैवत श्री देव रामेश्वर मंदिरात गणेश जयंती निमित्त पूजन करण्यात आलेल्या २१ पार्थिव गणपतींचे विसर्जन करण्यात आले. मंदिरात २२ जानेवारीपासून माघी गणेश जयंती उत्सव कार्यक्रम सुरु आहे. बुधवारी गणेश जयंतीचे औचित्य साधून गणेशयाग संपन्न झाले. यानिमित्त प्राणप्रतिष्ठा केलेल्या गणपतींचे विसर्जन आज करण्यात आले. यावेळी भक्तांनी गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष केला. गणेश भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून गणपतींचे दर्शन घेतले. रात्रौ गणपती भगवती आणि नागेश्वर दत्त पालखी तसेच तरंगदेवता यांची प्रदक्षिणाही पार पडली. या उत्सवाची सांगता आज शुकरवरी दुपारी महाप्रसादाने होत आहे.