परीक्षा पे चर्चा 2023 कार्यक्रमाचा भेडशी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी माध्यमिक शिक्षणाधिकारी शेख साहेब यांच्यासोबत घेतला आनंद

दोडामार्ग | सुहास देसाई : देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या संकल्पनेतील परीक्षा पे चर्चा 2023 या महत्वाकांक्षी कार्यक्रमाचा ऑनलाईन प्रक्षेपणाचा आनंद आज न्यू इंग्लिश स्कूल भेडशी हायस्कूलच्या ई.6वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांनी जि. प. सिंधुदुर्ग चे माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी श्री. मुस्ताक शेख यांच्यासोबत घेतला. या कार्यक्रम प्रसंगी प्रशालेचे मुख्याध्यापक नंदकुमार नाईक, विस्तार अधिकारी सौ. दीपा दळवी, केंद्रप्रमुख पाटगावकर , केंद्रप्रमुख सूर्यकांत नाईक, श्री साळुंखे , श्री परब , श्री फर्जंद , श्री मांगले , श्री बामणीकर , यावेळी भेडशी प्रशालेतील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर व सर्व विद्यार्थी उपस्थित होते.