मंडणगड | प्रतिनिधी : प्रतासत्ताक दिनाचे औचीत्यसाधून मंडणगड तालुका पत्रकार संघ व तहसिल कार्यालय मंडणगड यांच्या संयुक्त विद्यमाने तहसिल कार्यालयाचे आवारात आयोजीत करण्यात आलेल्या नमन या कार्यक्रमाने मंडणगड तालुक्यातील कला रसिक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. काळाच्या ओघात लोप पावत असलेल्या कोकणातील सांस्कृतीक प्रथा पंरपराना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने मंडणगड तालुक्याच्या सार्वजनीक जीवनातील इतिहासात प्रथमच नवयुग सेवा मंडळ आसगे टोळेवाडी यांच्या नमन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. निर्माता प्रभाकर टोळे, दिग्दर्शक प्रकाश टोळे, शाहिर विलास पातेरे यांच्या या कार्यक्रमात चाळीसहून अधिक कलाकरांनी आपली कला सादर केली. या कार्यक्रमात कृष्ण अवतार सहित नटखट गौळण, खट्याळ खोडकर मावशीच्या धम्माल बोबड्या पेंद्याचे विनोदाची धमाल रसिकांना अनुभवयास मिळाली.
काल्पनिक चित्त थरराक वघनाट्य महाकालीचा अवतार, गण महिषासुरचा वध वघनाट्य पापाचे प्रायश्चित्य, वैरी एका रक्तचा हा धमाल कार्यक्रम सादर करण्यात आला. उत्तम संगीत संयोजन पौरणीक कथांचे रंगमंचावर हुबेहुब सादरीकरण,उत्तम प्रकाश योजना यामुळे कोकणच्या या लोककलेची तालुकावासीयांना ओळख झाली. या कार्यक्रमाचे औचीत्यसाधून मंडणगड तालुका पत्रकार संघाचेवतीने अध्यक्ष विनोद पवार, प्रशांत सुर्वे, विजय पवार, सचिन माळी, प्रा.दगडू जगताप, विजय जोशी यांच्याहस्ते तहसिलदार विजय सूर्यवंशी, निवासी नायब तहसीलदार दत्तात्रय बेर्डे, संजय भिसे, पोलीस निरिक्षक शैलजा सावंत, लांजा पंचायत समितीचे माजी सभापती चंद्रकांत मणचेकर व नमनाचे निर्माते प्रकाश टोळे यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अँड. दयानंद कांबळे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडणगड तालुका पत्रकार संघाचे सर्व सदस्य व तहसिल कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली. तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी या कार्यक्रमास उपस्थिती दर्शवली.