उपविजेत्या स्वरा डगरे,तृतीय विजेत्या मानसी डगरे ;तिघांनाही पैठणी देत आ.नितेश राणे यांच्या हस्ते गौरव
कणकवली : असलदे उगवतीवाडी येथे ब्राम्हणदेव सेवा मंडळाच्या वतीनेश्री गणेश जयंती उत्सव , श्री सत्यनारायणाची महापुजा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.यानिमित्त कै.सुमती विश्राम लोके यांच्या स्मरणार्थक सोसायटी चेअरमन भगवान लोके पुरस्कृत होम मिनस्टर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.या स्पर्धेत प्रिया प्रेमानंद शेटये(कसई दोडामार्ग) पैठणीच्या मानकरी ठरल्या.तर उपविजेत्या स्वरा सिताराम डगरे,तृतीय विजेत्या मानसी मिलिंद डगरे (मधलीवाडी) विजेत्या ठरल्या,तिघांनाही पैठणी देत आ.नितेश राणे यांच्या हस्ते गौरविण्यात आले.होम मिनिस्टर स्पर्धा २०२३ मध्ये तब्बल ३० महिलांनी सहभाग घेतला.या स्पर्धेचे निवेदन पत्रकार उमेश परब यांनी करत वेगवेगळ्या ५ फेऱ्यांमध्ये स्पर्धा घेतली.या स्पर्धेत सहभागी सर्व महिलांना भेटवस्तू देत सन्मानित करण्यात आले.यावेळी माजी पंचायत समिती सदस्या हर्षदा वाळके,माजी सरपंच पंढरी वायंगणकर,नांदगाव सरपंच भाई मोरजकर यांच्या सह मंडळाचे पदाधिकारी व महिला उपस्थित होत्या.