जॉली स्पोर्ट्स दापोली येथील नूतनीकरण केलेल्या सभागृहास माजी अध्यक्ष डॉ. प्रशांत मेहता यांचे नाव.

Google search engine
Google search engine

दापोली | प्रतिनिधी: जॉली स्पोर्ट्स, दापोली येथील कै. सुधाकर पितांबर साबळे बॅडमिंटन हॉल या मुख्य इमारती शेजारील हाॅल चे नुकतेच नूतनीकरण करण्यात आले होते. सदर हॉल ला संस्थेच्या जडणघडणीत महत्वाचा वाटा असणारे तसेच संस्थेचे दीर्घकाळ अध्यक्ष राहिलेले कै. डॉ. प्रशांत मेहता यांचे नाव देण्यात यावे असे स्पोर्ट्स कमिटी चे अध्यक्ष श्री. प्रफुल्ल कुडाळकर यांनी सुचविले होते. या प्रस्तावास अध्यक्ष श्री. अरुण गांधी, उपाध्यक्ष श्री. माधव शेट्ये, सेक्रेटरी श्री. श्रीराम माजलेकर यांच्यासमवेत सर्व संचालक मंडळ व सभासदांनी एकमताने अनुमोदन दिले.
दिनांक 25 जानेवारी 2023 रोजी कै. डॉ. प्रशांत मेहता यांच्या जयंती चे निमित्त साधून हॉल च्या नामकरणाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी दापोली अर्बन बँकेचे चेअरमन श्री. जयवंत जालगावकर, संस्थेचे अध्यक्ष श्री. अरुण गांधी, उपाध्यक्ष श्री. माधव शेट्ये, सेक्रेटरी श्री. श्रीराम माजलेकर, श्री. सुभाष मालू, श्री. अन्वर रखांगे, श्री. प्रमोद तलाठी, श्री. आशिष मेहता, श्री. राहुल साबळे, श्री. प्रसाद मेहता, श्री. सुजय मेहता, श्री. निलेश हेदुकर, श्री. फझल रखांगे तसेच डॉक्टरांचे थोरले चिरंजीव डॉ. कुणाल मेहता व धाकटे चिरंजीव तेजस मेहता व इतर संचालक आणि मान्यवर उपस्थित होते