जिल्हा विज्ञान सोहळ्याचा सांगता समारंभ उत्साहात संपन्न.

Google search engine
Google search engine

दापोली | प्रतिनिधी: स्कूल कमेटी अध्यक्ष रविंद्र कालेकर यांचे अध्यक्षतेत पार पडलेल्या बक्षिस वितरण प्रसंगी शिक्षण विस्तार अधिकारी तथा माध्यमिकचे उपशिक्षणाधिकारी नरेंद्र गावंड यांनी विज्ञानप्रति निष्ठा आवश्यक असल्याचे प्रस्तावनेत सांगितले.तर ए.जी.हायस्कूल आणि दापोली शिक्षण विभागाच्या नियोजनाचे भरभरून कौतुक शिक्षक महेश कोरे यांनी केले.तर विज्ञान ही अशी गोष्ट आहे पुढच्या २५ वर्षाचा विचार करते.हे सांगत विविध पाच क्षेत्रात विज्ञानाची कामगिरी कशी भरीव होईल याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे जिल्हा विज्ञान मंडळाचे अध्यक्ष रविंद्र इनामदार यांनी मत व्यक्त केले, आणि सर्वांना शुभेच्छा दिल्या. यानंतर माध्यमिक शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत यांनी मनोगत व्यक्त करतांना,देशात मोबाईल गेम खेळण्यामध्ये रत्नागिरीचा पाचवा क्रमांक असल्याचे वाचनात आले ही गंभीर बाब असून, मुलांसह शिक्षकांना वाचन वेडं लागणे आवश्यक असून,जिल्ह्यातील १४७ वाचनालयाचे सभासद होउन सर्वांनी वाचनाकडे वळावे असे सुचित केले.

तसेच निसर्गातील शोध लावण्यासाठी आपण मुलांना प्रेरीत केले तर विद्यार्थी संशोधन करतील.इस्त्रो नासा उपक्रम माध्यमिक विभागासाठीही सुरु करण्याचा मानस सावंत यांनी व्यक्त केला.आपला विभाग कुठेही कमी नाही,फक्त गरज आहे ती push up करण्याची. जिल्हा सर्व सकारात्मक गोष्टींमध्ये पुढे जाईल यासाठी शिक्षकच महत्वाचे काम करु शकतो,असे सांगत त्यांनीही आयोजक,सर्व सहभागी स्पर्धक, विज्ञान मंडळ ,जिल्ह्यातून आलेल्या सर्वांचे आभार व्यक्त करुन उत्कृष्ठ नियोजनाबद्दल मुख्याध्यापक सतीश जोशी यांचा रत्नागिरी जिल्हापरिषद शिक्षण विभागामार्फत सत्कार केला.

परिक्षक प्रमुख डाॅ.कैलास गांधी यांनी प्रयोगात अभिनव प्रकारे मांडली जात असतांना त्याची उपयुक्तता काय आहे याचा विचार करुन प्रतिकृती तयार केली जावी यासाठी खर्चाचाही विचार झाला पाहीजे,असे सांगितले तर रविंद्र कालेकर यांनी अध्यक्षिय मनोगत व्यक्त करीत संस्थेला सर्वांची सेवा करण्याची संधी मिळाल्याचे सांगितले.शेवटी मुख्याध्यापक सतीश जोशी यांनी ९ तालुक्यातून आलेल्या सर्वांनी शिस्तिचे पालन करुन योजनांचा उपयोग करुन घेतल्याबद्दल तसेच राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवडलेल्या सर्वांना शुभेच्छा देत,सर्वांचे आभार व्यक्त केले,यावेळी व्यासपीठावर माध्य.शिक्षणाधिकारी,सुवर्णा सावंत, गोपाळ चौधरी,नरेंद्र गावंड,श्रीमती आखाडे विज्ञान मंडळ जिल्हाध्यक्ष रविंद्र इनामदार,गटविकास अधिकारी आर.एम.दिघे,गटशिक्षणाधिकारी अण्णासाहेबबळवंतराव ,व्याख्याते डाॅ.अनुराग पाणिग्रही, डाॅ.करमरकर,संचालक निलेश जालगावकर,मुख्या.सतीश जोशी तसेच संस्थेचे अन्य मान्यवर उपस्थित होते.सांगता सोहळ्याचे उत्कृष्ठ सुत्रसंचालन संदेश राऊत यांनी केले. यावेळी मान्यवरांचे हस्तेप्राथमिक व माध्यमिक विद्यार्थी तसेच शिक्षक,परिचर आदि विभागातून प्रत्येकी तीन प्रतिकृतीसह प्रश्नमंजुषेतील विजेत्या स्पर्धकांना प्रशस्तीपत्र,भेटवस्तू,सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. प्रत्येकी प्रथम आणि द्वितीय क्रमांक प्राप्त प्रतिकृती स्पर्धकांना राज्यस्तरीय स्पर्धेसाठी सहभाग घेता येणार आहे.