कणकवली तालुकाध्यक्षपदी अनंत पाताडे, कुडाळ तालुका अध्यक्षपदी गुरुनाथ दळवी देवगड तालुका अध्यक्षपदी स्वप्निल लोके यांची निवड
सिंधुदुर्ग : व्हॉइस ऑफ मीडिया या पत्रकारांच्या राष्ट्रीय संस्थेच्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी विजय गावकर, कार्याध्यक्ष विवेक ताम्हणकर, सरचिटणीसपदी राजन चव्हाण यांची निवड करण्यात आली आहे. हंगामी अध्यक्ष विवेक ताम्हणकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत सर्वानुमते या निवडी जाहीर करण्यात आल्या आहेत.
यावेळी जिल्हा कार्यकारणीच्या कोषाध्यक्षपदी विनोदी जाधव, सहसरचिटणीस पदी श्रेयश शिंदे, जिल्हा उपाध्यक्षपदी स्वप्निल तांबे यांची निवड करण्यात आली आहे.
या बैठकीत कणकवली तालुकाध्यक्षपदी अनंत पाताडे, कुडाळ तालुका अध्यक्षपदी गुरुनाथ दळवी, देवगड तालुका अध्यक्षपदी स्वप्निल लोके यांची निवड करण्यात आली.
आपला सिंधुदुर्ग लाईव्ह चे संपादक राजन चव्हाण यांच्या कार्यालयात व्हाईस ऑफ मीडियाची बैठक पार पडली. यावेळी विवेक ताम्हणकर, विजय गावकर, राजन चव्हाण, अनंत पाताडे, विनोद जाधव, श्रेयश शिंदे, स्वप्निल तांबे आदी उपस्थित होते.
याप्रसंगी पत्रकार बांधवांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली.
सकारात्मक पत्रकारिता केली गेली तर पत्रकारितेकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल. सकारात्मक पत्रकारिता हे सर्वसामान्यांच्या फायद्याचे आहे, त्या पत्रकारितेच्या माध्यमातून नक्कीच समाजाचे कल्याण होते, हा विचार आपोआपच लोकांमध्ये रुजेल. आपल्या उद्देशाची पूर्तता त्या ठिकाणी होईल. ‘व्हाईस ऑफ मीडिया’ पत्रकारिता शाबूत राहावी, पत्रकारितेकडे बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक राहावा, पत्रकारितेच्या माध्यमातून सर्वसामान्यांचा फायदा व्हावा, ही आपल्या पत्रकारितेची विचारधारा आहे, मार्गदर्शक तत्त्व आहे.सकारात्मक पत्रकारिता हा विचार रुजवण्यासाठीच ‘व्हाईस ऑफ मीडिया’ची निर्मिती झाली आहे. या विचाराशी बांधील राहून जिल्ह्यात काम करायचे ठरविण्यात आले.