कले सोबत मैत्री ही समृद्ध जीवनाची गुरुकिल्ली! अभिनेते निलेश पवार

Google search engine
Google search engine

ओसरगाव शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

मसुरे | झुंजार पेडणेकर : जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा ओसरगाव नंबर १ या शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन अभिनेता निलेश पवार व अध्यक्ष सुप्रिया अपराध यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. यावेळी सरपंच सुप्रिया कदम, उपसरपंच गुरुदास सावंत, शिक्षण विस्तार अधिकारी कैलास राऊत, ऍड तुषार परब, विलास परब, तंटामुक्ती अध्यक्ष प्रदिप तळेकर, पोलिस पाटील संजना आगणे, विवेक परब, घोरपडे मॅडम, बबली राणे, आणि शाळेचे मुख्याध्यापक किशोर कदम, राजश्री तांबे , वीलीस चौडणेकर संतोष राणे उपस्थित होते. झपाट्याने बदलणाऱ्या काळाची पावले ओळखत चंगळवादाच्या आहारी न जाता पालकांनी मुलांना बुद्धिनिष्ठ आणि कला सक्त बनवणे ही काळाची गरज आहे. त्यातूनच गुणवान आणि सशक्त मूल्य रुजवणारी पिढी निर्माण होऊ शकते. मिळालेल्या कौतुकाचं आत्मविश्वासात रूपांतर करून गुरुजन यांनी दाखवलेला रस्त्याचा हमरस्ता विद्यार्थ्यांनी बनवावा आणि आपल्या शिक्षकांच्या आणि पालकांच्या घामाचे गुलाब पाणी बनवावं असं मनोगत निलेश पवार यांनी शुभेच्छा देताना व्यक्त केले. तसेच मुख्याध्यापक किशोर कदम यांच्या कामाचे कौतुक केले.

शाळेने स्पोर्ट्स डे, ट्रॅडिशनल डे वेगळ्या पद्धतीने साजरे केले. यासाठी स्पोर्ट्स डे साठी विवेक परब यांस कडून गोल्ड मेडल व सिल्वर मेडल विद्यार्थ्यांना देण्यात आले.मुख्याध्यापक किशोर कदम यांना कविता लेखन स्पर्धेस एकता कल्चर काव्य पुरस्कार मिळाल्या बद्दलअभिनंदन करण्यात आले. मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किशोर तांबे ,रसिका तांबे शरयू कदम ,सोनाली आलव स्नेहल येरलकर,गणेश अपराध ,राजेश कदम,नेहा कदम, संजय जाधव ,राजू रोडये ,तरांगणी मोहीते ,सत्यवान,मोहिते,संदेश नाईक, जगनाथ राणे, तसेच पालक यांनी सहकार्य केले निवेदक शैलेश तांबे, प्रास्तविक किशोर कदम आभार संतोष राणे यांनी मानले.