कोंकण विभागात वेंगुर्ले येथील नितेश मयेकर यांचा कृषी पुरस्काराने गौरव…

कृषि क्षेत्रात उल्लेखनीय काम : आरसीएफ कंपनी चा उपक्रम

वेंगुर्ले | प्रतिनिधी : कृषि क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल कोंकण विभागात वेंगुर्ले तालुक्यातील कृषी सेवा केंद्राचे नितेश मयेकर यांचा राष्ट्रीय केमिकल फर्टिलायजर्स कंपनी मार्फत खास पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. देशातून एकूण 57 जणांना हा पुरस्कार दिला त्यामध्ये कोकणातून श्री. मयेकर यांचा समावेश आहे.
कृषि क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल तसेच कृषि विभागाच्या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांना विविध योजनेत समाविष्ट करून घेतले.मयेकर ऍग्रोटेक च्या या कृषी सेवा केंद्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पाण्याचा होत असलेला अतिरिक्त वापर ठिबक आणि तुषार सिंचनाच्या माध्यमातून जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले या सर्व कामाची दखल घेऊन हा पुरस्कार देण्यात आला आहे. राष्ट्रीय केमिकल फर्टिलायजर्स ही देशातील सर्वात मोठी खत कंपनी आहे.त्यामुळे हा मानाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल श्री. मयेकर यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
राष्ट्रीय केमिकल फर्टिलायजर्स कंपनी मार्फत आंबा व काजू शेतीमध्ये प्रगतिशील शेतकरी म्हणून कोंकण विभागातून सन २०२१-२२ साठी हे पुरस्कार जाहीर केले होते. मुंबई येथे हा पुरस्कार प्रदान कार्यक्रम झाला. आरसीएफ कंपनीचे चेअरमन श्री श्रीनिवास मूडगेरीकर तसेच कोंकण विभागाचे श्री दीपक पाटील, श्री गोवेकर व मार्गदर्शक श्री वराडकर साहेब आदी मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्राप्त सर्वांना गौरविण्यात आले