रंगोत्सव सेलिब्रेशन नॅशनल लेव्हल आर्ट कॉम्पिटिशन स्पर्धेत सुयोग आंब्रे नॅशनल सिल्व्हर ॲवॉर्ड पुरस्काराने सन्मानित

खेड (प्रतिनिधी) : रंगोत्सव सेलिब्रेशन मुंबई या संस्थेने सप्टेंबर २०२३ मध्ये राज्यस्तरीय रंगभरण, हस्ताक्षर, स्केचिंग व चित्रकला स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेसाठी देशातील विविध राज्यातील विविध भागातून लाखो स्पर्धक सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, कलेची आवड निर्माण व्हावी हेच या संस्थेचे उद्दिष्ट आहे. या स्पर्धेत सरस्वती शिक्षण संस्था गुणदे संचलित सद्गुरू काडसिद्धेश्वर विद्यालय गुणदे प्रशालेतील इयत्ता ५वी ते १० वी च्या २९६ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्यातील कु. सुयोग शाम आंब्रे याला नॅशनल सिल्वर (९९.९ प्युअर सिल्वर) ॲवॉर्ड आणि ट्रॉफी व सर्टिफिकेट मिळाले आहे.

कु.तनया मनोज साळवी हिचा चौथा क्रमांक आला असून कलर सेट विथ गोल्ड मेडल मिळाले आहे. कु.वेदांत शिंदे यास आर्ट मेरीट ॲवॉर्ड व ट्रॉफी मिळाली आहे.

तसेच १९ विद्यार्थ्यांनी गोल्ड मेडल, १५ विद्यार्थ्यांनी सिल्वर मेडल, १० विद्यार्थ्यांनी ब्रॉन्झ मेडल, १४ विद्यार्थ्यांनी सरप्राइज गिफ्ट संपादन केले आहे. त्याचबरोबर सरस्वती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष विक्रांत आंब्रे यांना पिनॅकल ॲवॉर्ड २०२३-२४ हा पुरस्कार व मुख्याध्यापिका सौ. अश्विनी जोशी यांना लीडर ऑफ एक्सेलेंस इन कल्चरल अक्टिव्हीटीजज्ञ २०२३-२४ हा पुरस्कार व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या कलाशिक्षक श्रीमती अनन्या कदम यांना कलाजीवी पुरस्कार व प्रमाणपत्र मिळाले आहे. सर्व यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे सरस्वती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष विक्रांत आंब्रे, उपाध्यक्ष अरविंद आंब्रे, सचिव सुभाष पवार व सर्व संचालक यांनी कौतुक व अभिनंदन केले. यापुढेही असेच यश संपादन करावे अशा शुभेच्छा दिल्या.