संजय पिळणकर यांचा माजी केंद्रीयमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते सन्मान

रक्तदान चळवळ व कोविड काळातील कार्याची घेतली दखल

सावंतवाडी । प्रतिनिधी : सातार्डा गावचे सुपुत्र व सिंधुरक्तमित्र प्रतिष्ठानचे सावंतवाडी- दोडामार्ग- वेंगुर्ला तालुका विभागीय अध्यक्ष संजय पिळणकर यांनी रक्तदान चळवळीत मोठे योगदान दिले आहे. विशेष म्हणजे त्यांनी कोविडच्या कठीण काळात सातार्डा येथे महारक्तदान शिबीर आयोजित करण्यासाठी पुढाकार घेतला.तसेच गोवा बांबोळी येथील बऱ्याच रुग्णांना रक्त मिळण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. त्यांच्या याच कार्याची दखल घेऊन वेंगुर्ला येथील ‘माझा वेंगुर्ला ‘च्यावतीने माजी केंद्रीयमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला.

संजय पिळणकर यांनी कोविड काळात पुढाकार घेऊन जंतुनाशक फवारणी सातार्डा,साटेली व सातोसे येथे केली होती.तसेच मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी कोविड ग्रस्तांसाठी ५१ हजार रुपये दिले होते. तसेच कुडाळ येथील एका रुग्णालयाला ५ हजार रुपयांचे बीपी मशीन भेट म्हणून दिले.तर शाळांमध्ये वृक्षारोपण कार्यक्रमांचे यशस्वी आयोजन केले.या समाजाभिमुख कार्याची दखल घेऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.

यावेळी सौं. उमा प्रभू, माजी नगराध्यक्ष राजन गिरप, निलेश चेंदवणकर, लखमराजे भोसले, सिंधुरक्त मित्र प्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष प्रकाश तेंडोलकर, सचिव किशोर नाचणोलकर आदी उपस्थित होते.

Sindhudurg