आमदार नितेश राणे यांनी घेतल्या शिक्षक मतदारांच्या प्रत्यक्ष भेटी
कणकवली देवगड वैभववाडी मतदारसंघात ज्ञानेश्वर म्हात्रे यांना मिळणार एकतर्फी मतदान
संतोष राऊळ | कणकवली : भारतीय जनता पार्टी आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्ष यांच्या युतीच्या सरकारमध्ये शिक्षकांचे प्रश्न सुटतील. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नारायण राणे,पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली युतीचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे विधान परिषदेत शिक्षकांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देतील असा विश्वास प्रत्येक शिक्षकांना आहे आणि हा विश्वासच कोकण विभागीय शिक्षक मतदार संघात ज्ञानेश्वर म्हात्रे यांना विजय मिळवून देईल याची मला खात्री आहे असा विश्वास कणकवली-देवगड- वैभववाडी चे भाजपचे आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केला.
भाजप चे आमदार नितेश राणे यांनी शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कणकवली-देवगड – वैभववाडी येथील शिक्षक मतदारांची प्रत्यक्ष भेट घेवून त्यांच्याशी चर्चा केली. त्या संदर्भात कणकवली येथे पत्रकारांशी बोलताना आमदार नितेश राणे म्हणाले, युतीचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्याबद्दल शिक्षकांच्या मनात असलेला आदर,प्रेम त्याच प्रमाणे म्हात्रे सरांची कार्यतत्परता, कार्यक्षमता याबद्दलचा विश्वास शिक्षकांमध्ये पाहावयास मिळाली. भारतीय जनता पार्टी आणि बाळासाहेबांची शिवसेना या दोन्ही पक्षाच्या युतीच्या सरकार मधून शिक्षकांचे प्रश्न विधान परिषदेच्या माध्यमातून ज्ञानेश्वर म्हात्रेच सोडवतील असा त्यांना विश्वास आहे. नवनवीन निर्णय आणि विकासाच्या संकल्पना आमचे युतीचे सरकार राबवत असल्याबद्दल शिक्षकांना आपले प्रश्न याच वेळी आमचे युतीचे सरकार सोडवेल असा विश्वास वाटू लागलेला आहे. विधान परिषदेत ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या रूपाने आपला प्रतिनिधी पाठवण्याचा संकल्पच कोकणातील शिक्षक मतदारांनी केला असल्याचे आमदार नितेश राणे यांनी सांगितले.
कोकण विभाग शिक्षक मतदार संघ निवडणूक युतीचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या प्रचारादरम्यान आमदार नितेश राणे यांनी वैभववाडी तालुक्यात दौरा केला, भुईबावडा पंचक्रोशीतही त्यांनी गाठीभेटी घेतल्या.यावेळी भाजप जिल्हा सरचिटणीस प्रमोद रावराणे, तालुका अध्यक्ष श्री.नासिरभाई काझी, जिल्हा बँक संचालक दिलीप रावराणे,सज्जनकाका रावराणे, जयेंद्र रावराणे, नगराध्यक्ष नेहा मानकर , उपनगराध्यक्ष संजय सावंतश्री.भालचंद्र साठे,अरविंद रावराणे,सौ.प्राची तावडे, बंड्या मांजरेकर, सौ.चोरगे,श्री.सुधीर नकाशे, शिक्षक वर्ग व इतर उपस्थित होते.
कणकवली तालुक्यातील शिक्षक मतदारांची आमदार नितेश राणे यांनी प्रत्यक्ष भेट घेतली. यावेळी डॉक्टर मिलिंद कुलकर्णी संदेश उर्फ गोट्या सावंत तालुका अध्यक्ष संतोष कानडे मिलिंद मिस्त्री बाळ जठार दिलीप तळेकर मनोज रावराणे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.