रक्तदान शिबिराचे केले आयोजन
संतोष कुळे | चिपळूण : तालुक्यातील कळंबस्ते येथील मोहिते नर्सिंग होमच्या ११व्या वर्धापन दिनानिमित्त रत्नागिरी जिल्हा रुग्णालयाच्या सहकार्यातून एस एस डी ट्रस्ट कळंबस्ते यांच्या माध्यमातून दिनांक 2 फेब्रुवारी रोजी कळंबस्ते येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. गेली अनेक वर्ष मोहिते नर्सिंग होम ग्रामीण भागातील आणि गरजू लोकांसाठी आरोग्याच्या सेवा पुरवत आहेत. सामाजिक शैक्षणिक व आरोग्य उपक्रम राबवत जनजागृतीपर कार्यक्रम सुद्धा करत आह याच मोहिते नर्सिंग होम यांचा ११ वा वर्धापन दिन सोहळा 2 फेब्रुवारी रोजी कळंब येथे आयोजित करण्यात आलेला आहे या वर्धापन दिनाचे औचित्य साधून रत्नागिरी रुग्णालयाच्या माध्यमातून रक्तदान शिबिर सुद्धा आयोजित करण्यात आले आहे. एस एस डी ट्रस्ट यांचे सुद्धा महत्त्वपूर्ण योगदान लागणार आहे. रत्नागिरी रुग्णालयाच्या डॉ. संघमित्रा फुले यावेळी उपस्थित राहणार आहेत. या रक्तदान शिबिरात सर्वांनी सहभागी होवून सहकार्य करावे असे आवाहन सुद्धा मोहिते नर्सिंग होमच्या माध्यमातून करण्यात आले आहे.