काँग्रेसने केली शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्याची मागणी

Google search engine
Google search engine

रत्नागिरी | प्रतिनिधी : शेतकऱ्यांच्या समस्या सतत वाढच होत आहे. सेबी ने शेतकऱ्यांचा वायदेबाजार वरती बंदी आणली आहे त्यामुळे डाळी,कापूस, सोयाबीन,गहू, तांदूळ, हरबरा तुर अश्या पिकांची दरा मध्ये खूप घसरण झाली आहे. त्यामुळे शेतकरी हतबल झाला असून आत्महत्या शिवाय त्यांच्याकडे पर्याय उरला नाही आहे. तसेच कोंकणातील अंबा, सुपारी,नारळ सारख्या बागायतदार शेतकऱ्यांना हवामान बदल होत असल्यामुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

प्रशासन कडे मुख्य मागण्या मध्ये
१)२०१५ पासून कोंकणातील शेतकऱ्याच्या कर्ज माफ करून सातबारा रिकामा करावा
२) वायदे बाजार वरील बंदी त्वरित उठवावी
३)नवीन देण्यात येणारे कर्ज ४ टक्के दराने देण्यात यावे
४) रत्नागिरी तालुक्यात कृषी व अंबा संशोधनं साठी सुसज्ज व अद्यावत विद्यापीठ स्थापन करावे
५) रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जिल्हापरिषद गटनिहाय शेती शाळा चालू करावी
६) कोंकणातील शेतकऱ्याचे अंबा, काजू ,सुपारी, हे मुख्य उत्पादन असून त्याच्यावर कोंकणातील अर्थव्यवस्था निर्भर आहे. तरी माकड , वानर व इतर उपद्रवी वन्यप्राणी यांच्या मुळे खूप नुकसान होत आहे. त्याचा त्वरित उपाय योजना करण्यात यावी.

अश्या आशयाचे निवेदन काँग्रेसच्या सोशल मीडिया विभाग जिल्हाध्यक्ष कपिल नागवेकर यांनी निवासी उपजिल्हा अधिकारी गायकवाड यांच्या कडे सोपवण्यात आले. तदप्रसंगी ओबीसी विभाग प्रदेश उपाध्यक्ष दीपक राऊत,जिल्हा चिटणीस रवींद्र खेडेकर,महिला तालुकाध्यक्ष रिझवणा शेख, नूतन गोरीवले इतर कार्यकर्ते उपस्थित होते.