मसुरे | झुंजार पेडणेकर : मसुरे येथील आर. पी. बागवे हायस्कुल आणि तांत्रिक विद्यालयास १९९२-९३ च्या बारावीच्या इलेक्ट्रॉनिक्स व इलेक्ट्रिकल बॅच कडून सुमारे दहा हजार रुपये किमतीची साऊंड सिस्टम भेट देण्यात आली. या बॅचचा विध्यार्थी व मालवण येथील आर. के. इलेक्ट्रॉनिकसचे मालक भाई कोयंडे यांनी सदर साउंड व्यवस्था सुपूर्द केली. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सौ. सरोज परब, लोकल कमिटी अध्यक्ष महेश बागवे, विठ्ठल लाकम, मुख्याध्यापक किशोर चव्हाण, सुनील बांदेकर, एन. एस. जाधव, भरत ठाकूर, रमेश पाताडे, शशांक पिंगुळकर, श्री घाटे, समीर नाईक आदी शिक्षक, पालक , विद्यार्थी उपस्थित होते. माजी विद्यार्थ्यांच्या या मदती बद्दल महेश बागवे यांनी आभार मानले.