रत्नागिरी : पंतप्रधान नरेंद्र जी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण देशभरामध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित कार्यप्रणालीवर आधारित भारताची वाटचाल या संदर्भात लेखनाचे विषय देण्यात आले होते. पंतप्रधान नरेंद्र जी मोदी यांचे काम पाहता त्यांचे लोकप्रियता पाहता अनेक लोकांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला होता. पंतप्रधान नरेंद्र जी मोदी एक अंगार, पंतप्रधान नरेंद्र जी मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताची वाटचाल आत्मनिर्भर कडे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकाभिमुख योजना, नरेंद्र मोदी एक अंगार… यांसारखे विषय निबंध स्पर्धेसाठी देण्यात आले होते रत्नागिरी जिल्हा दक्षिण यामधून शेकडो लोकांनी यावरती निबंध सादर केले होते.
सादर करण्यात आलेले सर्वच निबंध सुंदर होते. यामध्ये क्रमांक काढताना तज्ञ परीक्षक मंडळींची देखील कसोटी लागली. तज्ञ परीक्षकांकडून या निबंधांमधून क्रमांक काढण्यात आले. यामध्ये प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया या विषयावर निबंध सादर केलेल्या सौ वर्षा तेजस जोशी राहणार रत्नागिरी यांनी प्रथम क्रमांक मिळविला. तर नरेंद्र मोदी एक अंगार या विषयावर दीपा गजानन घोसाळकर राहणार मारुती मंदिर रत्नागिरी यांना द्वितीय क्रमांक प्राप्त झाला आहे. तर नरेंद्र मोदी एक अंगार या विषयावर निबंध सादर केलेले श्री. बाबासाहेब राजाराम लाड राहणार साखरपा, संगमेश्वर, रत्नागिरी यांना तृतीय क्रमांक मिळाला आहे. माही गिरीश वनकर ही सौ मीनाताई ठाकरे माध्यमिक विद्यालय साडवली इयत्ता सहावी मध्ये शिकणारी विद्यार्थिनी हिने या खुल्या गटातून घेण्यात आलेल्या स्पर्धेमध्ये उत्तेजनार्थ क्रमांक मिळविला आहे, संदेश प्रकाश झेपले राहणार पाटगाव, संगमेश्वर जिल्हा. रत्नागिरी यांना देखील या स्पर्धेमध्ये उत्तेजनार्थ क्रमांक देण्यात आले आहे.
यामध्ये क्रमांक मिळालेल्या स्पर्धकांना क्रमशः प्रथम क्रमांक एक हजार रुपये रोख प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह, द्वितीय क्रमांक सातशे रुपये रोख प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह, तृतीय क्रमांक पाचशे रुपये रोख प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह, तसेच दोन उत्तेजनार्थ यांना तीनशे रुपये रोख सन्मान चिन्ह प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे.
ही स्पर्धा भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष दीपक जी पटवर्धन यांच्या नेतृत्वाखाली, निलेश आखाडे यांच्या नियोजनात राबवण्यात आली होती. सर्व क्रमांक प्राप्त स्पर्धक यांनी लिहिलेले निबंध हे प्रकाशित करण्यात येणार असून सर्व यशस्वी स्पर्धकांचे भारतीय जनता पार्टीच्या वतीने जिल्हाध्यक्ष दीपक पटवर्धन यांनी कौतुक करत अभिनंदन केले आहे.