गुहागर तालुक्यातील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये उज्वल यश संपादन करावे : गटविकास अधिकारी प्रशांत राऊत

Google search engine
Google search engine

गुहागर तालुका अपंग पुनर्वसन संस्था (रजि.) व शिक्षण विभाग पंचायत समिती गुहागर यांच्या संयुक्त विध्यामाने इयत्ता ५ वी शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शन वर्गास तालुक्यातील विध्यार्थ्यांचा उस्फूर्त प्रतिसाद

पाटपन्हाळे (वार्ताहर) गुहागर तालुका अपंग पुनर्वसन संस्था (रजि.) व शिक्षण विभाग पंचायत समिती गुहागर यांच्या संयुक्त विध्यामाने इयत्ता ५ वी शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शन वर्ग नुकतेच श्री पुजा मंगल कार्यालय पाटपन्हाळे , ता.गुहागर येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाले. या इयत्ता ५ वी शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शन वर्गासाठी प्रमुख पाहुणे म्हणून गुहागरच्या कर्तव्यदक्ष तहसीलदार प्रतिभा वराळे , गटविकास अधिकारी प्रशांत राऊत, गटशिक्षणाधिकारी लीना भागवत, तज्ञ मार्गदर्शक पवार,( मुंबई), नामदेव धनावडे ,(सातारा, शामराव जुनहारे), अपंग संस्थेचे अध्यक्ष उदय रावणंग, सरचिटणीस सुनिल रांजणे, सल्लागार प्रकाश बापट, सुधाकर कांबळे , किरण शिंदे,रविंद्र कुळ्ये विस्तार अधिकारी पांचाळ , गळवे , सर्व केंद्रप्रमुख पं.स.गुहागर, शिक्षक वर्ग व विध्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व प्रतिमा पूजन करून करण्यात आली. गुहागर तालुका अपंग संस्थेच्या वतीने सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. गुहागर तालुका अपंग पुनर्वसन संस्था ही सर्वे प्रकारच्या दिव्यागांसाठी कार्य करणारी रत्नागिरी जिल्हयातील एकमेव संस्था असून या संस्थेच्या माध्यमातून तालुका, जिल्हा व राज्यस्तरीय अनेक उपयुक्त उपक्रम राबवीत आहे. संस्थेला कोणतेही शासकीय अनुदान नसतानाही एक सामाजिक बांधिलकी म्हणून दिव्यांगाव्यतिरिक्त इतर सामाजासाठीही कार्य करीत आहे. त्यामध्ये तालुक्यातील विशेष प्राविण्य मिळविलेल्या विध्यार्थ्यासाठी शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शन वर्गाचे आयोजन करण्यात आले . या शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शनासाठी तालुक्यातील २० केन्द्रातून व ०८ माध्यमिक विदयालायातून विशेष प्राविण्य मिळविलेल्या एकूण १८५ विध्यार्थी सहभागी झाले होते. प्रास्तविक करताना संस्थेचे अध्यक्ष उदय रावणंग यांनी संस्थेने राबविलेल्या उपक्रमांची माहिती करून दिली. या मार्गदर्शन वर्गास उपस्तथित विध्यार्थ्यांसाठी परीक्षेत उज्वल यश संपादन करण्यासाठी शुभेच्छा दिल्या . तहसीलदार मा.वराळे मेडम यांनी गुहागर तालुका अपंग संस्थेने राबविलेला शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शन वर्ग हा विध्याथ्यांसाठी एक अत्यावश्यक उपक्रम असल्याचे सांगितले. गटविकास अधिकारी प्रशांत राऊत यांनी गुहागर तालुक्यातील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये उज्वल यश संपादन करावे., असे सांगितले .गटशिक्षणाधिकारी लीना भागवत यांनी सर्व विद्यार्थ्यांना या परीक्षेमध्ये ३०० पैकी ३०० गुणांचे उद्धीस्ट ठेवून अभ्यास करावा. असे मार्गदर्शन केले. दोन दिवस चाललेल्या या इयत्ता ५ वी शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शन वर्गास तज्ञ शिक्षकांनी मोलाचे मार्गदर्शन केले. त्यांनी विविध कलुप्तया सांगितल्या.या कार्यक्रमाचे सूत्र संचलन संस्थेचे सल्लागार व सहाय्यक शिक्षक किरण शिंदे यांनी केले .तर आभार मधुकर गंगावणे यांनी मानले. या दोन दिवसाच्या मार्गदर्शन वर्गास राजेंद्र आरेकर साहेब यांनी आपला श्री पुजा मंगल कार्यालय मोफत वापरण्यास दिला. तसेच विध्यार्थ्यांसाठी खाऊची व्यवस्था सल्लागार रविंद्र कुळ्ये यांनी केली. मार्गदर्शन वर्ग यशस्वी करण्यासाठी उपाध्यक्ष प्रकाश अनगुडे सर, सरचिटणीस सुनिल रांजणे, सल्लागार किरण शिंदे , विजय पाटील,कु.कोमल शिंदे,राजेश खामकर,संतोष कदम यांनी विशेष प्रयन्न केले.