पाटपन्हाळे | वार्ताहर : गुहागर तालुक्यातील पालपेणे येथे श्री वरदान देवी प्रिमियर लिग श्री खेम वरदान देवीच्या कृपाशिर्वादाने पार पडल्या यासाठी सहकार्य करणा-या ग्रामस्थांचे, क्रीडाप्रेमींचे, संघमालक व खेळाडूंचे मनापासून आभार मानण्यात आले.श्री खेम वरदान देवी पुरस्कृत पालपेणे प्रिमियर लीग २०२३ पर्व २ रे याचे खास आकर्षण म्हणजे गावातील सर्व मंडळे, ग्रामस्थ व क्रीडाप्रेमी व खेळाडू यांच्या सहकार्यातून ग्रामदेवतेच्या नावाने बनविलेला सव्वा किलोंचा चांदिचा फिरता चषक……! ही स्पर्धा व चांदिचा चषक म्हणजे ग्रामदेवतेचे मांगल्य, पावित्र्य, देवीचा मान-सन्मान, तीचा आशिर्वाद व पालपेणे गावातील सर्व ग्रामस्थांचे एकतेचे व गावच्या अस्मीतेचे प्रतिक आहे. पालपेणे गावासाठी ही स्पर्धा नसून ग्रामदेवतेच्या नावाचा एक क्रीडा सोहळा आहे. यावर्षीच्या क्रीडा सोहळ्याचे उदघाटन डॉ. राजेंद्र पवार व दादू गुहागरकर यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व सदस्य व बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते. श्री खेम वरदान देवी पुरस्कृत पालपेणे प्रिमियर लीग सुरु करण्यामागे एकच कारण आहे ते म्हणजे किमान वर्षातील दोन दिवस तरी गावातील तरुण मुलांनी ग्रामस्थानी एकत्र यावे, एकमेकांशी सुसंवाद साधावा व त्यातून गावाची एकता साधून गावच्या सामाजीक, शैक्षणिक, कला, क्रीडा, सांस्कृतीक इत्यादि सर्वच क्षेत्रामध्ये एक चांगल्या प्रकारचा विकास साधावा. यावर्षीचा चषक श्री शिव छत्रपती शिवाजी महाराज यांचे नावे ठेवणेत आलेला होता. प्रत्येक वर्षी वेगवेगळया सत्पुरुषांच्या नावे चषक ठेवून त्यांच्या कार्याचा गौरव करून त्यांच्या आठवणी व स्मृती तरुणांमध्ये जागृत करून ठेवण्याचे काम या लीगचे माध्यमातून करण्यात येत आहे.. सदरची स्पर्धा ही शिस्तीची स्पर्धा म्हणून गुहागर तालुक्यात नावारुपास येत आहे.
यावर्षी याच लीगचे माध्यमातून गावातील सर्व महिलांसाठी हळदिकुंकू समारंभ आयोजीत करुन महिलांच्या कार्याला प्रोत्साहीत करून त्यांना सुध्दा यथोचीत मान-सन्मान देण्यात आला. यावर्षी याच लीगचे माध्यमातून तालुक्यातील सर्वच समाजातील अध्यक्षांचा यथोचीत मान सन्मान करून आपण सर्व एकच आहोत. आपण सर्व गुहागरकर आहोत, आपण सर्व भारतीय आहोत ही भावना जागृत करण्याचा छोटासा प्रयत्न करणेत आला व सर्व समाजाला यथोचीत मानसन्मान देण्यात आला. यामध्ये रामचंद्र हुमणे गुरुजी (कुणबी समाज) डॉ. प्रकाश शिर्के व भगवानशेठ कदम (मराठा समाज), विनायक काताळकर (लोहार समाज), प्रकाश झगडे (तेली समाज) अरविंद पालकर (कुंभार समाज) साबीरभाई साल्हे (मुस्लीम समाज),प्रशांत शिरगावकर व भाई बेलवलकर (वैश्यवाणी समाज) सुभाष रजपूत (गोसावी समाज) विजय जानवळकर (चर्मकार समाज), सुनिल जाधव (बौध्दजन संघ) , धामणस्कर (सुतार समाज) या समाज अध्यक्षांनी भेट दिली. सदरची स्पर्धा ही लाखाची नसून ती आमच्या जीवा भावाची आहे हे पालपेणे ग्रामस्थांनी आपल्या सहकार्यातून व उपस्थितीने दाखवून दिले. या क्रीडासोहळ्याला अनेक मान्यवरांनी भेट देवून शुभेच्छा दिल्या त्यामध्ये मा. रामदास राणे, सुरेशदादा सांवत,नगराध्यक्ष राजेश बेडल , प्रदिप बेंडल, नाना वराडकर, मुन्ना जैतपाल, गौरव बेल्हाळ, कोकण कार्टी फेम प्रीतेश रहाटे, पाटपन्हाळे गावचे पोलीस पाटील सत्यप्रकाश चव्हाण, बीट अंमलदार शिवलकर साहेब, अजयभाऊ खाडे, ओकार संसारे, शोएबशेठ मालाणी, संदिप मांडवकर, अजित बेलवलकर, सचिन म्हसकर (सरपंच त्रिशुल साखरी,) जान्हवी शिरगावकर( सरपंच जानवळे,) पाटपन्हाळे गावचे सरपंच विजयदादा तेलगडे व उपसरपंच आसिमशेठ साहे, संतोष सोलकर अध्यक्ष कुणबी पीमीयर लीग, दादू गुहागरकर, पालपेणे गावच्या सरपंच योगीता पालकर, उपसरपंच रघुनाथ घाणेकर व सर्व ग्रामपंचायत सदस्य, संजय पालकर( तंटामुक्ती अध्यक्ष), गावातील सर्व मंडळांचे अध्यक्ष यांनी उपस्थिती दाखविली.