आजगाव अध्यापक विद्यालयाचे प्रा. बी. आर . वाणी यांना पितृशोक

Google search engine
Google search engine

सावंतवाडी । प्रतिनिधी : तालुक्यातील विद्या विकास अध्यापक विद्यालय, आजगावचे प्रा. बी. आर. वाणी यांचे वडील माजी सैनिक तथा प्रगतीशील शेतकरी रामू वाणी (८४, रा. तुडये, ता. चंदगड ) यांचे शनिवारी रात्री १२.४५ वाजता वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. त्यांनी १९५७ ते १९६५ या काळात सैनिक म्हणून देशसेवा बजावली होती. त्यांच्या पश्चात २ मुली, मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे. आज रविवारी त्यांच्यावर तुडये येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले